Makar Sankranti 2024 : ग्रहाचा राजा सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा अनेक राशींना याचा लाभ होतो. सूर्याचे मकर राशीत प्रवेश करणे अधिक विशेष असते. जानेवारी महिन्यात धनु राशीचा त्याग करुन सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. यंदाची मकरसंक्रांत ही रविवारी येत आहे. रविवार हा सुर्याचा वार आहे. त्यामुळे या संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनिच्या घरी मकर राशीत येतो आणि एक महिना मकर राशीत राहतो. या काळात शनि आणि सूर्याची कृपा काही राशींवर होऊ शकते. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या.
वृषभ –
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण फायद्याचे ठरणार आहे. या लोकांना धनलाभ होऊ शकतो. करिअरसाठी हा काळ उत्तम आहे आणि या लोकांची प्रगती होईल. काही लोकांना मोठ्या कंपनीतून मोठ्या पदावरची नोकरी मिळू शकते.पगारवाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी शुभ काळ आहे.
सिंह –
सिंह राशीच्या लोकांना सूर्याचे मकर राशीत प्रवेश करणे लाभदायक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढेल. करिअरमध्ये अनेक नव्या संधी येतील. व्यवसायात मोठा लाभ होऊ शकतो.गुंतवणूकीत फायदा दिसून येईल.
धनु –
सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यामुळे धनु राशीचे नशीब चमकेल. या राशीच्या लोकांना कौटूंबिक सुख लाभेल. जोडीदाराची साथ मिळेल.करिअरसाठी काळ उत्तम आहे. मेहनतीच्या जोरावर यश मिळेल. लोकांकडून तुमची प्रशंसा केली जाणार. पगारवाढ होण्याची शक्यता आहे.
मीन –
सूर्याचे राशी संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरेल. हे लोकं प्रत्येक काम प्रबळ इच्छाशक्तीने पूर्ण करतील. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल.जीवनात आनंद येईल. पैसै कमावण्याच्या अनेक संधी समोर येतील. याबरोबर जास्तीत जास्त पैशांची बचत करता येईल.जोडीदाराबरोबर नाते घट्ट होईल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)