14 January 2025 Panchang And Rashi Bhavishya : १४ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी मंगळवारी रात्री ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत राहील. तसेच वाघ्यात योग ५ वाजून ६ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तर पुनर्वसु नक्षत्र सकाळी १० वाजून १७ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर पुष्य नक्षत्र जागृत होईल. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजेपर्यंत असणार आहे.

त्याचप्रमाणे आजपासून महा कुंभमेळा सुरू होणार आहे.पौष पौर्णिमेच्या दिवशी महा कुंभाचे पहिले शाही स्नान होणार आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार पौष महिन्याची पौर्णिमा सोमवार १३ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजून ३ मिनिटांनी सुरू होईल आणि १४ जानेवारी रोजी ३ वाजून ५६ मिनिटांनी संपेल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

त्याशिवाय आज नववर्षातील पहिला सण मकर संक्रांती असणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याच्या राशीच्या बदलाला संक्रांती म्हणतात. त्यामुळे हा दिवस सूर्याची पूजा करण्याचा आणि सूर्यासोबत निसर्गाचे आभार मानण्याचा सण आहे. या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो. तर आजचा दिवस तुमच्यासाठी राशीसाठी कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…

१४ जानेवारी पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Horoscope in Marathi):

मेष:- धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

वुषभ:- दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल. प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. मैत्रित मतभेद आड आणू नका.

मिथुन:- वैचारिक स्थैर्य बाळगा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला.

कर्क:- भावंडांना मदत कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

सिंह:- कामानिमित्त प्रवास घडेल. हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते. लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक माघार घेतील.

कन्या:- आहाराची पथ्ये पाळावीत. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. आवडी-निवडी कडे अधिक लक्ष द्याल.

हेही वाचा…Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या

तूळ:- अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. व्यावसायिक योजनावर विचार कराल.

वृश्चिक:- काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल.

धनू:- हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.

मकर:- मनातील साशंकता दूर करावी. धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ:- घरगुती वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक कामात आनंद मानाल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर टाळावा.

मीन:- सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. आततायीपणा करू नका. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल. धैर्य व संयम आवश्यक.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader