Makar Sankranti Astrology : मकर संक्रांती हा वर्षाचा पहिला सण अगदी काही दिवसांवर आहे. या निमित्त्याने सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. दान धर्म इत्यादी दृष्टीकोनातून या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. १४ जानेवारी २०२४ रविवार, मध्यरात्री २ वा. ३५ मिनिटांनी धनु राशीचा त्याग करुन सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. एका राशीचा त्याग करुन जेव्हा दुसऱ्या राशीत प्रवेश केला जातो, त्याला संक्रमण म्हणतात.
सूर्य प्रत्येक महिन्याला एक रास बदलत असतो. जानेवारी महिन्यात धनु राशीचा त्याग करुन सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. या दिवसाला एवढं महत्त्व का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या दिवशी उत्तरायणाची सुरूवात होते. यंदाची मकरसंक्रांत ही रविवारी येत आहे. रविवार हा सुर्याचा वार आहे. त्यामुळे या संक्रांतीला विशेष महत्त्व आहे.

मकर संक्रांत १४ जानेवारी मध्यरात्री २ वा. ३५ मिनिटांनी सुरू होत असली तर त्याचा पुण्यकाळ हा १५ जानेवारी सुर्योदर्यापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे. यंदा मकर संक्रांतीचे १२ राशींना कोणते फळ मिळणार आहे, या विषयी पंचांगकर्ते डॉ.पं.गौरव देशपांडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा

मेष – आर्थिक लाभ होईल
वृषभ – व्यावसायिक प्रगती होईल.
मिथुन – भाग्योदयात अडचणी निर्माण होतील.
कर्क -आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
सिंह – भरभराट दिसून येईल, विवाह, व्यवसायात सकारात्मक दिसून येईल.
कन्या – रोगराईचा नाश होईल.
तूळ- विद्यार्थ्यांची प्रगती होईल आणि अचूक निर्णय घ्याल.
वृश्चिक – मानसिक चंचलता दिसून येईल.
धनु- पराक्रमामध्ये वृद्धी दिसेल. अचूक निर्णय घ्याल.
मकर – धनहानी होऊ शकते.
कुंभ – शारिरीक आणि मानसिक सौख्य लाभेल.
मीन -धनहानी होऊ शकते.

हेही वाचा : जानेवारीमध्ये ‘या’ तीन राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा, मिळू शकतो अपार पैसा

२७ नक्षत्रांना यंदा मकर संक्रांतीला कोणते फळ मिळणार याविषयी पंचांगकर्ते डॉ.पं.गौरव देशपांडे सांगतात –

धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा – प्रवास
उत्तराभाद्रपदा,रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिता, रोहिणी – सर्वसुखप्राप्ती
मृग, आद्रा, पुनर्वसू – शरीरपीडा
पुष्य, आश्र्लेषा, मघा, पूर्वाफाल्गूनी, उत्तराफाल्गूनी, हस्त -लाभ
चित्रा, स्वाती, विशाखा – द्रव्यनाश
अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण – धनप्राप्ती