Makar Sankranti Astrology : मकर संक्रांती हा वर्षाचा पहिला सण अगदी काही दिवसांवर आहे. या निमित्त्याने सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. दान धर्म इत्यादी दृष्टीकोनातून या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. १४ जानेवारी २०२४ रविवार, मध्यरात्री २ वा. ३५ मिनिटांनी धनु राशीचा त्याग करुन सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. एका राशीचा त्याग करुन जेव्हा दुसऱ्या राशीत प्रवेश केला जातो, त्याला संक्रमण म्हणतात.
सूर्य प्रत्येक महिन्याला एक रास बदलत असतो. जानेवारी महिन्यात धनु राशीचा त्याग करुन सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. या दिवसाला एवढं महत्त्व का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या दिवशी उत्तरायणाची सुरूवात होते. यंदाची मकरसंक्रांत ही रविवारी येत आहे. रविवार हा सुर्याचा वार आहे. त्यामुळे या संक्रांतीला विशेष महत्त्व आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा