Malavya Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या स्थितीचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. यापैकी एक ग्रह शुक्र आहे. शुक्र हा धन, प्रेम, ऐश्वर्य, सुख इत्यादींचा कारक मानला जातो. जेव्हा जेव्हा शुक्र आपली राशी बदलतो, तेव्हा सर्व १२ राशींच्या लोकांवर त्याचा प्रभाव पडतो. वैदिक कॅलेंडरनुसार सध्या शुक्र धनु राशीत आहे, पण २०२५ मध्ये शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. द्रिक पंचांगानुसार, मंगळवार, २८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी शुक्र मीन राशीत परिवर्तन करेल. यावेळी शुक्राच्या मीन राशीतील प्रवेशाने मालव्य राजयोग तयार होईल. या योगाचा काही राशींवर खूप शुभ प्रभाव पडेल. यामुळे या राशींचे भाग्य उजळून आर्थिक भरभराट होईल. या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊ.

मालव्य राजयोगाने ‘या’ राशींवर होईल धनवर्षाव अन् येतील सुखाचे दिवस? (Malavya Rajyog 2025)

0

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
budhaditya rajyog 2024 | rajyog in horoscope astrology
१७ नोव्हेंबरनंतर ‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोगामुळे करिअरमध्ये प्रगती अन् उत्पन्न होणार दुप्पट!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या राशीसाठी ठरेल लाभदायक? बाप्पा करणार का तुमच्या इच्छा पूर्ण; वाचा सोमवारचे राशिभविष्य
Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
Lord Surya Dev Favorite Zodiac Sign
Lord Surya Dev Favorite Zodiac: सूर्यदेवाला खूप प्रिय आहेत या तीन राशी, कमी वयात कमावतात पैसा

वृषभ (Vrishabha Rashi)

वृषभ राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष खूप भाग्यशाली ठरू शकते. शुक्र हा वृषभ राशीचा अधिपती ग्रह आहे आणि या राजयोगाच्या निर्मितीमुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतूनही नफा मिळू शकतो. या काळात नशीब पूर्ण साथ देईल. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. कोणतेही महत्त्वाचे काम प्रलंबित असेल तर ते यावेळी मार्गी लागू शकते. तुमच्या जोडीदाराबरोबरचे नाते घट्ट होईल आणि तुम्ही एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. वकील आणि व्यावसायिकांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर असेल. या काळात जर तुम्ही योग्य प्रकारे पैसे गुंतवले तर तुम्हाला भविष्यात मोठा नफा मिळेल.

Mangal Vakri 2024 : ७ डिसेंबरपासून ‘या’ पाच राशींच्या आयुष्यात उलथापालथ; मंगळाच्या उलट्या चालीमुळे धनहानी अन् कामात अडचणी

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या लोकांसाठीही मालव्य राजयोग खूप शुभ राहील. या काळात भाग्याची तुम्हाला चांगली साथ मिळू शकेल. तुम्हाला करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळतील. तुम्ही कोणत्याही कामात घेत असलेल्या मेहनतीचे तुम्हाला चांगले फळ मिळेल. परदेशात प्रवास करण्याची संधी चालून येईल. ऑफिसमधील वातावरण चांगले राहील आणि तुम्हालाही उत्साही वाटेल. तुमच्या जोडीदाराशी चांगले संभाषण होईल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. नवीन मित्रही बनतील आणि समाजात तुमची ओळख वाढू शकते. व्यवसायात फायदा होईल आणि गरजू लोकांना मदत केल्याने अधिक शुभफळ प्राप्त होतील.

धनु (Dhau Rashi)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर राहील. मालव्य राजयोगामुळे तुम्हाला भौतिक सुख आणि संपत्ती मिळू शकते. कुटुंबातील काही जुनी संपत्तीही मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आणि तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. व्यवसाय करणाऱ्यांनाही फायदा होऊ शकतो. समाजात तुमची ओळख निर्माण होईल, त्यामुळे मान-सन्मान वाढेल, न्यायालयाशी संबंधित प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. यावेळी तुमची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होऊ शकते, जी तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घडवून आणू शकते.

(टीप – सदर लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)