Mangal And Guru Yuti:  ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा अधिपती मंगळ ठराविक काळानंतर राशी बदलत राहतो. मंगळ हा धैर्य, आत्मविश्वास, चिकाटी, उत्साह इत्यादींचे कारक मानला जातो. अशा वेळी मंगळाच्या राशी बदलण्याचा प्रभाव १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच पडतो. तर गुरु ग्रहाला समृद्ध, धन, ऐश्वर्य, अध्यात्म आणि ज्ञानाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे जेव्हा या राशीच्या दोन्ही ग्रहांची युती निर्माण होते तेव्हा या क्षेत्रातील विविध क्षेत्रांवर खास प्रभाव होतो. आता मंगळ उद्या १२ जुलैला शुक्राच्या वृषभ राशीत गोचर करणार आहे तर या राशीत देवगुरु आधीपासूनच विराजमान आहेत. त्यामुळे वृषभ राशीत या दोन्ही ग्रहांची युती होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांना आयुष्यात अपार यश, सुख लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात या भाग्यशाली राशी कोणत्या…

‘या’ राशींचे नशीब पालटणार?

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी गुरु आणि मंगळाची युती अधिक फायदेशीर ठरु शकेल. यामुळे मेष राशीच्या लोकांना यावेळी आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. अडकलेला पैसा तुमच्याकडे परत येऊ शकतो. या काळात तुमचा पगार वाढू शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. करिअरमध्ये तुम्ही भाग्यवान सिद्ध होऊ शकता. या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
Mars Transit 2025 In Gemini
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात निर्माण होणार अडचणी; मंगळाच्या वक्री चालीने उद्भवणार आर्थिक समस्या
Mercury in Pisces will create Nichbhang Rajayoga
पैसाच पैसा! बुध ग्रह मीन राशीत निर्माण करणार नीचभंग राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
Shadashtak Yog 2025
आजपासून बुध-मंगळ निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती भरपूर पैसा कमावणार
Mangal Gochar 2024
पुढील ७८ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशी कमावणार पैसा आणि प्रतिष्ठा

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु आणि मंगळाची युती लाभदायी ठरु शकते. कौटुंबिक नात्यात गोडवा राहू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. नोकरदारांचे पगार वाढू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात तुमची बचतही वाढू शकते. तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता.

(हे ही वाचा : वाईट काळ संपणार! ऑगस्टपासून बुधलक्ष्मी कृपेने ‘या’ राशींचे सुखाचे दिवस येणार? मिळू शकतो बक्कळ पैसा )

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना, मंगळ आणि गुरूच्या संयोगाने करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. गुरूच्या कृपेने सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुमच्या कामात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

धनु राशी

मंगळ आणि गुरुच्या युतीमुळे धनु राशीच्या लोकांना या काळात चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तुमच्यासाठी खुले होऊ शकतात. या काळात तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला यश मिळू शकतो. 

मीन राशी

मंगळ आणि गुरुच्या युतीमुळे कार्यक्षेत्रात प्रगती आणि यश प्राप्त होऊ शकतो. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारु शकते. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येऊ शकते. या काळात तुम्ही नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता. 

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader