Aditya Mangal Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होतात. या राजयोगांचा थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. आता ५ फेब्रुवारीला ग्रहांचा अधिपती मंगळाने मकर राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे मकर राशीत रुचक राजयोग निर्माण होत आहे. तर दुसरीकडे सूर्यदेव मकर राशीत विराजमान आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीने ‘आदित्य मंगल योग’ निर्माण झाला आहे. हा योग काही राशींना शुभ परिणाम देणारा ठरु शकतो. त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना मिळू शकतो लाभ…
आदित्य-मंगल राजयोगात भाग्यवान ठरणार ‘या’ राशी?
मेष राशी
आदित्य मंगल राजयोग निर्माण झाल्याने मेष राशीच्या लोकांना अच्छे दिन अनुभवायला मिळू शकतात. प्रगतीच्या नव्या संधी मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कामातील अडथळे दूर होऊ शकतात. न्यायालयीन प्रकरणात आपल्या बाजूनं निकाल लागू शकतो. पदोन्नतीच्या नव्या संधी मिळू शकतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांती नांदू शकते.
(हे ही वाचा: ७ मार्चला बुध उदयासह ‘या’ ३ लोकांचा होणार भाग्योदय? माता लक्ष्मी कृपेने मिळू शकते अपार धन श्रीमंती)
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी आदित्य मंगल राजयोग बनल्याने अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नोकरीमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते. भौतिक सुखसोयी आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी आदित्य मंगल राजयोग वरदानच ठरु शकतो. या काळात तुमच्याकडे पैसा येण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तुमच्या कार्यक्षेत्रातही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती अचानक सुधारण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)