Surya And Mangal Rashi Parivartan: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की सूर्य आणि मंगळ त्यांच्या राशी बदलणार आहेत. मंगळ १३ मार्चला आणि सूर्यदेव १५ मार्चला आपली राशी बदलणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. परंतु अशा ३ राशी आहेत, ज्यासाठी यावेळी लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

वृषभ राशी

मंगळ आणि सूर्य देवाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण सूर्यदेव तुमच्या राशीतून ११व्या भावात राशी बदलेल. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुधारणा होईल. यासोबतच वैवाहिक जीवन आनंदी राहील. त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. दुसरीकडे, शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळू शकतो.

three zodiac luck will change from 23 September
२३ सप्टेंबरपासून बदलणार ‘या’ तीन राशींचे नशीब, अचानक होणार धनलाभ अन् मिळणार अपार पैसा
20th September Rashi Bhavishya in marathi
२० सप्टेंबर पंचांग: अश्विनी नक्षत्रात कोणत्या राशींचे प्रश्न…
Mercury-Ketu will come together after 18 years
१८ वर्षांनंतर बुध-केतू येणार एकत्र; कन्या राशीतील युती ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा
Saturn-Mercury Conjunction
नुसता पैसाच पैसा; शनी-बुध ग्रहाच्या अद्भूत संयोगाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल घडवणार? यश, समृद्धी, कीर्तीचा पाऊस पाडणार; वाचा तुमचे भविष्य
18th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१८ सप्टेंबर पंचांग: पंचांगानुसार आज कोणाच्या कुंडलीत होणार उलथापालथ? आरोग्य तर धन-संपत्तीकडे द्यावं लागणार लक्ष; वाचा तुमचे राशीभविष्य
Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
When is Ganesh Chaturthi 2025 in Marathi
Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी कोणत्या तारखेला साजरी होईल? जाणून घ्या नेमकी तारीख आणि महत्त्व
17th September Rashi Bhavishya & Panchang
१७ सप्टेंबर पंचांग: पैशांचा वापर करा जपून तर निर्णयांवर राहा ठाम; धृती योगाचा तुमच्या राशीवर कसा पडणार प्रभाव? वाचा तुमचं राशीभविष्य

मिथुन राशी

मंगळ आणि सूर्य देवाचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण मंगळ तुमच्या राशीतून १२व्या भावात प्रवेश करणार आहे आणि सूर्य देव तुमच्या कुंडलीच्या दहाव्या भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. तसेच व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. दुसरीकडे, या राशीचे लोक जे सरकारी संस्थेशी संबंधित आहेत त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील.

( हे ही वाचा: ४ दिवसांनी ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? सूर्य शनिच्या राशीतून बाहेर पडताच मिळणार बक्कळ धनलाभाची संधी)

वृश्चिक राशी

सूर्य आणि मंगळाचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण मंगळ तुमच्या राशीतून सातव्या भावात आणि सूर्यदेव पाचव्या भावात असणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील. त्याचबरोबर भागीदारीच्या कामात चांगले यश मिळू शकते. या काळात तुमचा पगार वाढेल. हा काळ तुमच्यासाठी फलदायी ठरेल. तसेच, प्रेम प्रकरणात यश मिळू शकते. दुसरीकडे, जे लोक अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)