Mangal Ast 2023 : मंगळ ग्रहाला धैर्य आणि पराक्रमाचा कारक आणि ग्रहांचा सेनापती मानलं जातं. २३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून २६ मिनिटांनी मंगळ कन्या राशीत अस्त झाले असून २३ जानेवारी २०२४ रोजी उदय होणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे अनेक राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. मंगळ अस्त झाल्यामुळे अनेक राशींवर सकारात्म प्रभाव पडणार आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ रास (Taurus Zodiac)

मंगळाचा अस्त वृषभ राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळवून देणारा ठरु शकतो. व्यावसायिक जीवनात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळू शकते. तुमच्या कामाची सर्वजण प्रशंसा करण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळू शकते. तुमची परदेशात काम करण्याची इच्छाही पूर्ण होऊ शकते. व्यवसायातही तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

मीन रास (Pisces Zodiac)

मीन राशीच्या लोकांसाठी मंगळ अस्त होणं फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला करिअरमध्ये यश मिळू शकते. प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करून यश संपादन करू शकता. तुमची आर्थिक स्थितीही सुधारू शकते. नशीबाची तुम्हाला साथ मिळू शकते. या काळात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज भासू शकते.

हेही वाचा- सूर्य-मंगळ युती होताच ‘या’ राशींचे लोक दिवाळीनंतर मालामाल होणार? अचानक अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता

धनु रास (Sagittarius Zodiac)

धनु राशीच्या लोकांना मंगळाचा अस्त संमिश्र परिणाम देऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती थोडी मजबूत होऊ शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकता. व्यवसायिकांना यश मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)