Rashi Parivartan 2022: सनातन धर्मात नवग्रहांना विशेष महत्त्व आहे. लोकांच्या जीवनावर ग्रहांचे संक्रमण आणि राशी परिवर्तनाचा विशेष प्रभाव पडतो. ग्रहांच्या राशीतील बदल हा काही ग्रहासाठी शुभ आणि काही ग्रहासाठी अशुभ मानला जातो. तसंच, या काळात ग्रह शुभ स्थितीत राहिल्याने व्यक्तीला खूप फायदा होतो. मंगळ, बुध आणि गुरू या ग्रहांनी राशिचक्र बदलले आहे. त्यांचा प्रभाव पुढील वर्षी सहा जानेवारीपर्यंत राहील. या काळात हा बदल काही राशींसाठी चांगली बातमी घेऊन येईल. त्यांना पैशाची कमतरता भासणार नाही आणि सर्वत्र फायदे मिळतील. अशा स्थितीत जाणून घेऊया की या तीन ग्रहांच्या बदलांचा कोणत्या राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होईल.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ, बुध आणि गुरूचे संक्रमण खूप आनंददायी असणार आहे. येत्या काही महिन्यांत या लोकांना खूप चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सहा जानेवारीपर्यंत नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांना जबरदस्त यश मिळू शकेल. या काळात मिथुन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडप्यांमधील कटुता दूर होईल.
( हे ही वाचा: Chanakya Niti: ‘या’ लोकांपासून नेहमी दूर राहा; ते कधीही करू शकतात तुमचा विश्वासघात!)
तूळ राशी
६ जानेवारी २०२३ पर्यंतचा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. मंगळ, बुध आणि गुरूच्या राशी बदलामुळे या राशीच्या लोकांचे नशीब उजळेल. कार्यालयात अधिकाऱ्यांचे सहकार्य व स्नेह प्राप्त होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल, त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
वृश्चिक राशी
मंगळ, बुध आणि गुरूचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. ६ जानेवारीपर्यंतचा काळ या राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. या काळात सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. जे काही काम करण्याचा विचार करत आहात, त्यात सर्वांना यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
( हे ही वाचा: शनिदेवाने मकर राशीत गोचर करत बनवला केंद्र त्रिकोण राजयोग! ‘या’३ राशींना प्रगतीसोबत होईल प्रचंड धनलाभ)
मीन राशी
मीन राशीसाठी मंगळ, बुध आणि बृहस्पतीच्या राशीतील बदल वरदानापेक्षा कमी नाही. मीन राशीच्या लोकांना या तिन्ही ग्रहांमुळे खूप फायदा होईल. व्यवसायात वाढ होऊ शकते. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर या काळात ते परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. विद्यार्थी वर्गालाही विशेष लाभ मिळेल.