Mangal Gochar Effect 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या मार्गक्रमणाचे म्हणजेच गोचरचे स्वत:चे असे वेगळे महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींच्या जातकांच्या आयुष्यावर होतो असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती असलेल्या मंगळ ग्रहाचे १० मे रोजी कर्क राशीमध्ये मार्गक्रमण झाले आहे. कर्क राशीला मंगळ ग्रहाची दुर्बल रास मानले जाते. अशा वेळी काही राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पाहायला मिळतो. तर या काळात काही राशींच्या जातकांचे नशीब उजळते. मंगळाच्या गोचरादरम्यान कोणत्या राशींचे लोक भाग्यवान ठरणार आहेत ते जाणून घ्या.

मेष रास

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ जेव्हा कर्क राशीमध्ये गोचर होतो तेव्हा मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. या काळात या राशींच्या जातकांना शिक्षण क्षेत्रामध्ये चांगला परिणाम दिसू शकतो. उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि व्यक्तीच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव पडू शकते, असे मानते जाते. दरम्यान, या काळात आई-वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे असंही मानत.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ

वृषभ रास

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाच्या गोचराचा या राशींच्या जातकांना विशेष लाभ मिळू शकतो. असं म्हणतात की, मंगळाच्या मार्गक्रमणाच्या काळात या राशींच्या जातकांना आनंदाची बातमी मिळू शकते. वाहन आणि जमीन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या लोकांची इच्छा लवकर पूर्ण होऊ शकते, असे मानले जाते. एवढेच नाही तर नोकरी करणाऱ्यांसाठी हा गोचर चांगला काळ घेऊन येईल. तसेच कामासंबधित समस्या दूर होऊ शकतात असेही मानतात.

हेही वाचा – ‘या’ ४ राशींवर असते हनुमंताची जबरदस्त कृपा? संकटातून नेहमी वाचवू शकतात मारुतीराया

मिथुन रास

ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात मिथुन राशींच्या लोकांच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. या काळात मिथुन राशींच्या लोकांना जोडीदारासोबत प्रवास करण्याची संधी मिळू शकते असे मानले जाते. या काळात सामाजिक मानसन्मानाची प्राप्ती होऊ शकते. विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजविण्यात अपयशी ठरू शकतात असेही मानतात.

कन्या रास

ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या जातकांसाठी येत्या ३५ दिवसांत अधिक शभ आणि लाभदायी ठरतील. मंगळ गोचरादरम्यान या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे मानले जाते. या काळात आर्थिक समस्यांपासून सुटका मिळू शकते, व्यवसायातही चांगला लाभ होऊ शकतो असे मानतात. असे म्हणतात की, नोकरी करणाऱ्यांसाठी या काळात चांगले बदल होऊ शकतात आणि मित्रांच्या सान्निध्यात राहायला मिळू शकते, जो एक चांगला अनुभव असेल.

हेही वाचा – ‘या’ ५ राशींच्या लोकांसाठी गप्पा म्हणजे जीव की प्राण? स्वभावावरुन कसे ओळखू शकता, वाचा

तूळ रास

ज्योतिषशास्त्रानुसार, हा काळ तूळ राशींच्या लोकांसाठी खूप बदल घडवून आणू शकतो. असं म्हणतात की या काळात कुटुंबातील सदस्यांसह नाते दृढ होऊ शकते, मुलांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात आणि सन्मानामध्ये वाढ होऊ शकतात. तसेच जमीन खरेदी करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला असल्याचे सांगितले जाते. व्यवसायात या काळात अगणित यश मिळू शकते. तसेच कामातही यश मिळू शकते असेही म्हणतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)