Mangal Gochar In Tula Rashi :ज्योतिषशास्त्रात नवग्रहाच्या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व असते. हे ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करतात. ज्याचा १२ राशींच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो. अशातच आता ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मानला जातो मंगळ आज ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून १२ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. हा ग्रह उग्र आणि पुरुष प्रधान मानला जातो. शुक्राची स्वामित्व राशी तुळमध्ये मंगळाने प्रवेश केला आहे. तर मंगळाच्या या राशी परिवर्तनाचा कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊ या.
‘या’ राशींना मंगळाच्या गोचरमुळे लाभ होऊ शकतो.
वृषभ रास
या राशीच्या सहाव्या स्थानी मंगळ असेल. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसायात मोठ्या प्रमाणात यश मिळू शकते. नोकरदारांना प्रमोशनसह मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. मात्र या काळात तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
सिंह रास
शुक्र सूर्याच्या राशीच्या तिसऱ्या स्थानी गोचर करत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये नवीन ऊर्जा, धैर्य आणि आत्मविश्वास वाढू शकतो. तुमच्या संवाद कौशल्यावरही परिणाम होऊ शकतो. या काळात कुटुंबाच्या पाठिंब्याने तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुमचे व्यावसायिक जीवन चांगले असू शकते. या काळात नोकरदारांची पगारवाढ होऊ शकते. तर नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीची संधी मिळू शकते.
तूळ रास –
या राशीत मंगळ लग्न स्थानी गोचर करणार आहे. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहू शकते. तसेच तुम्हाला अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच अविवाहितांना लग्नाचे काही प्रस्ताव येऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते तसेच तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याची शक्यात आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)