Mangal Gochar in Dhanu: ग्रहांचं राशी परिवर्तन ही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वाची व अनेक गोष्टींवर परिणाम करणारी घटना असते. ज्योतिष शास्त्रात मंगळ हा ग्रह शुभ मानला जातो. ज्या राशींवर मंगळाची कृपा असते, त्यांचे जीवन मंगलमय होते, त्यांच्या आयुष्यात आनंद कायम राहतो, असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे. आता वर्षाच्या शेवटी ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह २७ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे याचा प्रभाव काही राशींवर शुभ दिसून येण्याची शक्यता आहे. या राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

मेष राशी

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीतील लोकांना मंगळाचा होत असलेला राशी बदल शुभ परिणाम देऊ शकतो. या काळात मेष राशीच्या व्यावसायिकांना मोठी डील किंवा मोठी ऑर्डर मिळू शकते. व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. नवीन नोकरीची ऑफरही मिळू शकते. परदेश दौऱ्यावरही जाऊ शकता. दुसरीकडे, अविवाहित लोकांचं लग्न ठरू शकतं.

Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Budh gochar in makar january
आता नुसती चांदी; बुधाचा शनीच्या राशीतील प्रवेश ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकवणार, भरपूर पैसा देणार
six-planet-planet-will-making-in-pataka-yog-effect-of-all-zodiac-sign
१०० वर्षांनी मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी आकाशात निर्माण करत आहे ‘पताका योग’, १२ राशींवर कसा होईल परिणाम?
magal
ग्रहांचा सेनापती मंगळचा ‘नीच’ राशीतील काळ संपला! ‘या’ तीन राशींना मिळेल १०० पट्टीने अधिक लाभ; नव्या नोकरीबरोबर धन लाभाचा योग!
Mars-Uranus 2025
मंगळ-यूरेनस ‘या’ तीन राशींना देणार गडगंज श्रीमंती; ३६ तासानंतर मिळेल प्रत्येक कामात यश

(हे ही वाचा : ९ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? देवगुरु मार्गी होताच माता लक्ष्मीच्या कृपेने मिळू शकतो अपार पैसा )

तूळ राशी

मंगळाचे राशी बदल तूळ राशीच्या लोकांसाठी खूप आनंद घेऊन येणारं ठरु शकते. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. केलेली गुंतवणूकही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना या काळात चांगले निकाल मिळू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण वेळ मिळू शकेल. घरात सुख, शांती आणि समृद्धी राहू शकते. समाजात मान सन्मान-वाढू शकतो.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशींच्या लोकांवर मंगळदेवाची विशेष कृपा राहू शकते. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. एवढंच नाही तर या लोकांचे उत्पन्न वाढून या काळात आर्थिक स्थिती चांगली होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला तिथून चांगला नफा मिळू शकतो. वाहन, जमीन, घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते यावेळी पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. या काळात प्रगतीच्या नवीन संधीही उपलब्ध होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader