Mangal Gochar 2023 in Kanya: ज्योतिषशास्त्रात मंगळाला खूप महत्त्व आहे. त्याला ऊर्जा आणि सामर्थ्याचा घटक मानले जाते. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. सूर्य, चंद्र आणि बृहस्पति हे त्याचे मित्र ग्रह मानले जातात. मंगळ हा आक्रमकता, उत्साह, धैर्य, शक्ती, उर्जा, जमीन आणि विवाह यांचा कारक मानला जातो. मंगळच्या स्थितीवर अनेक राशींच्या लोकांना व्यापार, कार्यक्षेत्र आणि धनसंपत्तीमध्ये लाभ होतो. त्यामुळे लवकरच मंगळ ग्रहामुळे काही राशींना त्यांचा मेहनतीचं फळ मिळणार आहे.

१८ ऑगस्ट २०२३ रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे संक्रमण काही राशींसाठी फलदायी ठरु शकते. यासोबतच बुधही कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कन्या राशीत मंगळ आणि बुध यांच्या संयोगामुळे काही राशींच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला ठरु शकतो. कामात यश मिळू शकते. तसेच धनलाभही होऊ शकतो, चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील…
Dev Uthani Ekadashi 2024
Dev Uthani Ekadashi 2024 Date: का साजरी केली जाते देवउठणी एकादशी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि महत्त्व…
Surya Nakshatra Parivartan 2024
उद्यापासून नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ ३ राशींना देणार पैसा आणि मानसन्मान
Rahu Gochar 2025
राहु गोचरमुळे या तीन राशींवर येऊ शकते आर्थिक संकट, दिसून येईल अशुभ प्रभाव
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Astrological Predictions Future of India 2024 and Narendra Modi Government in Marathi
Astrological Predictions India 2024 : ‘आर्थिक झळ ते मानसिक समस्यांमध्ये वाढ’; शनीची वक्रदृष्टी? भारताचे पुढे काय होणार? वाचा ज्योतिषांची भविष्यवाणी
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : फक्त ३ दिवसानंतर या राशींचे बदलणार नशीब, शुक्र गोचरमुळे मिळणार अपार पैसा अन् धन

‘या’ राशींचे शुभ दिवस सुरू?

मेष

मंगळाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरु शकते. तुमच्या शत्रूंचा तुमच्याकडून पराभव होऊ शकतो. कोणताही खटला किंवा वाद चालू असेल तर त्यात विजय मिळू शकतो. कोणतेही महत्त्वाचे काम यशस्वी होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून संयमाने वागलात तर हा काळ तुम्हाला खूप लाभ देऊ शकतो. उत्पन्नही वाढू शकते.

(हे ही वाचा : ऑक्टोबरपासून ‘या’ तीन राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या गोचरामुळे होऊ शकतात लखपती! )

मिथुन

मंगळाचे भ्रमण मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ देऊ शकते. तुमचा व्यवसाय वाढून तुमच्या नफ्यात वाढ होऊ शकते. तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकतो. लाभाच्या संधी मिळू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकतो.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचे गोचर पैसे कमावण्याच्या अनेक संधी घेऊन येणारे ठरु शकते. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. नोकरीच्या माध्यमातून परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.  करिअरमध्ये खूप पुढे जाऊ शकता. आरोग्यही चांगले राहू शकते.

वृश्चिक

हा काळ वृश्चिक राशीच्या मंडळीसाठी भाग्योदय करून देणारा ठरु शकतो. तुमचे नशिबाचे दरवाजे उघडू शकतात. या राशीतील लोकांसाठी प्रमोशन, उत्तम नोकरी, वेतनवाढ होण्याचे योग आहेत. बँक-बॅलन्स वाढू शकतो. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)