Mangal Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक वेळी प्रत्येक ग्रह त्यांच्या ठरलेल्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या राशीबदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर होताना दिसतो. धैर्य, शौर्य, पराक्रम, जमीन आणि लग्नाचा कारक मंगळ ग्रह लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. मंगळदेव कुंभ राशीत गोचर करणार आहेत. १५ मार्चला मंगळदेव गोचर करणार आहेत. त्यामुळे काही राशींना शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. तुमची रास यात आहे का, जाणून घ्या… 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींना होणार धनलाभ?

मेष राशी

मंगळ गोचरमुळे मेष राशीच्या लोकांचे अच्छे दिन येऊ शकतात. या लोकांना करिअरमध्ये यश संपादन करता येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. अडकलेली कामं सहज मार्गी लागू शकतात. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. घरात शुभ कार्य होऊ शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

ग्रहांचा सेनापती मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे सिंह राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. यावेळी तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तुमच्या योजना या काळात यशस्वी होऊ शकतात.

कुंभ राशी

मंगळाचा गोचर कुंभ राशीसाठी फायदेशीर ठरु शकतो. तुम्हाला व्यवसायातून मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. हा काळ गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरु शकतो. शेअर बाजार, सट्टाबाजी आणि लॉटरीतून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. सुख, समृद्धी आणि कीर्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमवू शकतात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(टीप-वरील माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangal gochar 2024 in kumbh rashi rajyog positive impact of these zodiac sing can get huge money pdb