Mangal Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशी एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करते. ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम राशीचक्रातील इतर राशींवर पडतो. आज जन्माष्टमीच्या दिवशी मंगळ ग्रहाने का दुपारी ३ वाजून ४०मिनिटांनी मिथुन राशीमध्ये प्रवेश केला आहे. २० ऑक्टोबर पर्यंत मंगळ मिथुन राशीमध्ये विराजमान राहणार आहे. मंगळ ग्रहाने मिथुन राशीमध्ये प्रवेश केल्याने मेष सह काही राशींचे नशीब चमकू शकते. या दरम्यान या राशींच्या लोकांना जमीन घर आणि वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. जाणून घेऊ या, त्या राशी कोणत्या?
मेष राशी – मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर शुभ वार्ता घेऊन येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. यादरम्यान हे लोक कोणत्याही अडचणींचा सहज सामना करू शकतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहीन.
मिथुन राशी – मिथुन राशीसाठी मंगळ गोचर शुभ ठरणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे या लोकांच्या कमाईमध्ये वाढ होईल. आर्थिक स्त्रोत वाढतील. मंगळ गोचरमुळे या लोकांची आर्थिक वृद्धी होईल. या लोकांच्या घरात सुख समृद्धी नांदेल. हे लोक घर जमीन आणि वाहन खरेदी करू शकतात.
सिंह राशी – सिंह राशीसाठी मंगळ गोचर अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. यादरम्यान या दरम्यान या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. या दरम्यान या राशीचे लोक इतरांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरतील. या लोकांची आर्थिक वृद्धी होईल.
कन्या राशी – मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे कन्या राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढेल. या दरम्यान हे लोक करियरशी संबंधित मोठया संधीचे सोने करू शकतात. नशीबाचा साथ मिळाला त्या लोकांना मोठ्या कामात यश मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी या लोकांची प्रगती होईल.
हेही वाचा –२ सप्टेंबरपासून धन-वैभवाचा दाता शुक्र ‘या’ राशींवर करेल कृपा! मिळेल भरपूर यश अन् बक्कळ पैसा
मकर राशी – मंगळ ग्रह मकर राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरू शकतो. या दरम्यान लोकांना धनलाभाचे योग जुळून येईल. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. यांना मनाप्रमाणे यश मिळेल. या दरम्यान हे लोक नवीन काम सुरू करू शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)