Mangal Gochar 2024: ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा सर्वात प्रभावशाली मानला जातो. भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. आता मंगळ धनु राशीत विराजमान आहे. येत्या ५ फेब्रुवारीला मंगळ रात्री ९ वाजून ७ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या राशी बदलामुळे काही राशींच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. जाणून घेऊया मंगळाच्या गोचरचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना चांगला परिणाम मिळू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

मेष राशी

मंगळदेव या राशीच्या दहाव्या भावात गोचर करणार आहेत. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. यावेळी तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते. जे व्यावसायिक आहेत त्यांना यावेळी कोणत्याही व्यावसायिक व्यवहारातून फायदा होऊ शकतो. कोर्टात सुरू असलेली प्रकरणे तुमच्या बाजूने सुटू शकतात. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी चांगल्या घडण्याची शक्यता आहे. जे लोक रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात त्यांना चांगली डील मिळू शकते. 

(हे ही वाचा : फेब्रुवारीपासून ‘या’ ३ राशींना मिळणार चांगला पैसा? ‘चतुर्ग्रही योग’ बनल्याने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी)

तूळ राशी

या राशीच्या चौथ्या भावात मंगळदेव गोचर करणार आहेत. या काळात तूळ राशीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येण्याची शक्यता आहे. जे बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांना ते परत मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो.

वृश्चिक राशी

या राशीच्या तिसऱ्या भावात मंगळदेव गोचर करणार आहेत. मंगळ गोचरमुळे वृश्चिक राशीच्या लोकांचे नशिब पालटण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते. अडकलेली कामं सहज मार्गी लागू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी चालून येऊ शकतात. तुम्हाला व्यवसायातून मोठ्या फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. मित्र आणि कुटुंबियांकडून तुम्हाला सहकार्य लाभण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)