Mangal Gochar 2024 In Marathi: ज्योतिषशास्त्रातील नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा सर्वात प्रभावशाली मानला जातो. भूमी, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मंगळ ज्यावेळी मार्ग बदलतो तेव्हा त्याचा मोठा परिणाम मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह शक्ती, शस्त्र आणि शूरतेचा कारक मानला जातो. १२ जुलैला ७ वाजून ३ मिनिटांनी मंगळाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे.  मंगळाचे हे संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरु शकते. तर काही राशींना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक चणचण भासू शकते. पुढचे ४५ दिवस या राशींनी सावधान राहण्याची गरज आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

‘या’ ६ राशींच्या जीवनात मोठे संकट येण्याची शक्यता

मेष राशी

मंगळाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांवर अनेक नकारात्मक परिणाम करू शकते. एकीकडे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल पण जीवनात सुख-शांती लाभण्याची शक्यता कमी आहे. घरामध्ये भांडणे व वाद होऊ शकतात. कोणतेही प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचू शकते. तुमच्या कार्यक्षेत्रावर याचा प्रभाव वाईट परिणाम दिसून येऊ शकतो.

मिथुन राशी

मंगळाच्या राशीतील बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना याकाळात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. खर्च जास्त होऊ शकतो. काही कारणास्तव तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते. आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद वाढण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

मंगळाच्या संक्रमणामुळे कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात चढ-उतार पाहायला मिळू शकतात. नातेसंबंध टिकवण्यात अडचणी येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. निद्रानाश आणि तणाव वाढू शकतो.

तूळ राशी

मंगळाच्या राशीतील बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना आर्थिक चणचण भासू शकते. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव जाणवू शकतो. तसंच, तुमच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. या काळात तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या हातातून अनेक कामे निसटण्याची शक्यता आहे. 

धनु राशी

मंगळाच्या गोचरामुळे धनु राशीच्या लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. शत्रूंपासून थोडे सावध राहण्याची गरज आहे. सरकारी कामातही कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडथळे येतील.  यासोबतच कुटुंबात काही ना काही कारणावरून मतभेद होऊ शकतात. 

कुंभ राशी

मंगळाच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा नुकसान होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या प्रगतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. 

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)