Mangal Gochar 2025 : ग्रहाचे सेनापती मंगळ नवीन वर्षामध्ये मिथुन राशीमध्ये गोचर करणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला साहस, पराक्रम आणि भूमी तसेच वीरतेचा प्रतिक मानला जातो. मंगळ २०२५ मध्ये मिथुन राशीमध्ये गोचर करणार आहे तसेच वक्री गतीने चालणार आहे. मंगळ मिथुन राशीमध्ये गोचर केल्याने राशिचक्रातील १२ राशींवर प्रभाव दिसून येईल. जानेवारी २०२५ मध्ये मंगळ ग्रहाचे मिथुन राशीमध्ये गोचर काही राशींसाठी भाग्यशाली ठरू शकते. त्या राशींच्या लोकांना धनसंपत्तीमध्ये वाढ, पगारात वृद्धी आणि नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. (Mangal Gochar 2025 mars transit in mithun rashi four zodiac signs will get money and wealth)
मंगळ गोचर २०२५
मंगळ २१ जानेवारी २०२५ रोजी मंगळवारी सकाळी नऊ वाजून ३७ मिनिटांनी मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर ३ एप्रिल २०२५ रोजी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
मंगळ गोचरचा कोणत्या राशींना होईल फायदा?
सिंह राशी
मंगळ गोचरचा सिंह राशीच्या लोकांना फायदा दिसून येईल. मंगळाच्या प्रभावाने या लोकांच्या धनसंपत्तीमध्ये वृद्धी दिसून येईल. अडकलेले काम पूर्ण होईल. नोकरीच्या ठिकाणी यश प्राप्त होईल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. नशीबाची साथ मिळेन. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. या लोकांना पदोन्नती मिळू शकते.
धनु राशी
मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे लाभदायक ठरू शकते. मंगळ गोचरपासून धनु राशीच्या कुटुंबात वृद्धी दिसून येईल. जमीन, घर, वाहन खरेदी करू शकतात. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. नशीबाची साथ मिळेन.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर शुभ फळ देणारा ठरेल. हा गोचर जीवनात आर्थिक प्रगती आणेल. आई वडिलांचे सहकार्य लाभेन. काही लोकांची मनाप्रमाणे नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते. व्यवसायात प्रगती होईल. काही सिंगल लोकांचे लग्न ठरू शकते
मीन राशी
मीन राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन शुभ ठरणार आहे. मंगळ गोचरच्या प्रभावामुळे या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. काही लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. बिघडलेली कामे मार्गी होतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)