Mangal Gochar 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानले जाते. येत्या काही दिवसात मंगळ राशी परिवर्तन करणार असून २१ जानेवारी २०२५ रोजी मंगळ वक्री चालीत मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याचा नकारात्मक प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे काहींना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मंगळ निर्माण करणार अडचणी
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची वक्री चाल खूप अनुकूल सिद्ध होणार नाही. या काळात तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या या काळात सावध राहा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील. तणावाचा सामना करावा लागेल. तसेच व्यर्थ पैसे खर्च होतील. त्यामुळे या काळात शांत राहून प्रत्येक निर्णय घ्या, कोणत्याही कामाच घाई करू नका. स्वार्थी लोकांपासून दूर रहा.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळ ग्रहाची वक्री चाल फारशी चांगली होणार नाही. या काळात तुमची आर्थिक तंगी दूर होईल. कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींचाही सामना कराला लागेल. त्यामुळे सांभाळून राहा. त्यामुळे वायफळ खर्च करू नका. तसेच कुठेही गुंतवणूक करण्यापासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी विणाकारण वाद घालू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सांभाळून चालवा. तसेच या काळात कुटुंबात कोणतेही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
हेही वाचा: पैसाच पैसा! बुध ग्रह मीन राशीत निर्माण करणार नीचभंग राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
वृश्चिक
मंगळ ग्रहाची वक्री चाल वृश्चिक राशीसाठी अनेक अडचणी निर्माण करणारी असेल. या काळात धनहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. आयुष्यात अडचणी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील. तणावाचा सामना करावा लागेल. तसेच व्यर्थ पैसे खर्च होतील. त्यामुळे या काळात शांत राहून प्रत्येक निर्णय घ्या, कोणत्याही कामाच घाई करू नका. स्वार्थी लोकांपासून दूर रहा.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)