Mangal Gochar 2025: ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, यावेळी मंगळ स्वामी वक्री स्थितीत आहे आणि लवकरच मिथुन राशीत प्रवेश करेल. या वर्षी मंगळाचे हे पहिले मोठे गोचर असल्याचे म्हटले जात आहे. वक्री अवस्थेत मंगळाचा प्रभाव वेगळा असतो. साधारणपणे, ग्रहांच्या वक्री गतीचा नकारात्मक परिणाम होतो, परंतु २१ जानेवारी रोजी मंगळाच्या राशीतील हा बदल तीन राशीच्या लोकांसाठी खूप खास मानला जातो. मंगळाच्या या गोचरमुळे या राशीच्या लोकांचे भाग्योदय होईल.
मंगळ कधी मार्गी आणि वक्री अवस्थेत असेल?
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ७ डिसेंबर २०२४ रोजी वक्री झाला आणि २४ फेब्रुवारी २०२५ रोजी तो मार्गी होईल. याआधी, २१ जानेवारी २०२५ रोजी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. हा बदल काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
वृषभ (Taurus)
मिथुन राशीतील मंगळाचे वक्र भ्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या धन घरात मंगळ ग्रहाचे भ्रमण होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. अनेक स्रोतांकडून पैसा येईल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर आणि समृद्ध होईल.
तूळ (Libra )
तूळ राशीसाठी, मंगळाचे भ्रमण नवव्या घरात असेल, जे भाग्याचे घर आहे. अशा परिस्थितीत, या काळात नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल, ज्यामुळे प्रलंबित कामे देखील पूर्ण होतील. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येतील. कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी तुम्हाला बळ आणि धैर्य मिळेल. रागावर नियंत्रण राहील.
हेही वाचा – ४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे भ्रमण खूप शुभ राहील. प्रेम जीवनातील सर्व समस्या संपतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. जोडीदारबरोबरचे संबंध गोड आणि समजूतदार असतील. आरोग्य चांगले राहील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. नशीब तुमच्या बाजूने असल्याने, जीवनाच्या इतर क्षेत्रातही सकारात्मक बदल दिसून येतील. व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे काम पूर्ण होईल.
© IE Online Media Services (P) Ltd