Mangal Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. सध्या मंगळ कर्क राशीमध्ये वक्री झाला असून तो फेब्रुवारी २०२५ मध्ये तो सरळ मार्गस्थ होईल. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पडेल.
मंगळाचे राशी परिवर्तन
वृषभ
वृषभ राशीच्या दुसऱ्या घरात मंगळ असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या सुख- सुविधांमध्ये वाढ होईल. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. व्यवसायातही मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मार्गस्थ मंगळ खूप लाभदायक ठरेल. या राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असेल. या काळात अनेक धार्मिक यात्रा कराल. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास, नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. यासोबतच उच्च अधिकारी तुमच्या कामावर खूश होऊ शकतात. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही बनवलेल्या रणनीतीद्वारे तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उघडले जाऊ शकतात. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल.
कन्या
मार्गस्थ मंगळाचा कन्या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर पैसाही मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यामुळे व्यवसायात सुरू असलेल्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आरोग्यही चांगले राहिल.
(टीप: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)