Mangal Gochar 2025: ज्योतिषशास्रामध्ये मंगळ ग्रहाला ग्रहाचा सेनापती मानले जाते. तो कल्याणकारी ग्रह मानला जातो आणि प्रत्येक ४५ दिवसांमध्ये राशी परिवर्तन करतात. ते अनेकदा वक्री चाल चालतात. त्यांना संपूर्ण १२ राशींचे चक्र पुर्ण करण्यासाठी जवळपास २२ महिन्यांचा वेळ लागतो. त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो.
आता मंगळ मकर संक्रांती नंतर २१ जानेवारी २०२५ रोज वर्षाचा पहिला गोचर करणार आहे. ते वक्री चाल म्हणजे उलट चाल खेळून मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या तीन राशींसाठी पुढील ४५ दिवस अतिशय चांगले राहणार. हे लोक घरी लक्झरी वस्तू खरेदी करू शकतात. जाणून घेऊ या, त्या राशी कोणत्या आहेत.
वृश्चिक राशी (Vrushik Zodiac)
या राशीच्या लोकासाठी मंगळ गोचर फायदेशीर ठरू शकतो. २१ जानेवारी नंतर आपल्या कुंडलीमध्ये भाग्य योग निर्माण होत आहे ज्यामुळे या लोकांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो आणि पित संपत्ती प्राप्त होऊ शकते. जुन्या गुंतवणूकीतून मोठी रक्कम प्राप्त होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. समाजाता मान सन्मान मिळू शकतो. आरोग्य उत्तम राहीन.
कन्या राशी (Kanya Zodiac)
मंगळ गोचर नंतर कन्या राशीच्या लोकांना अप्रत्याशित भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. हे लोक नवीन वाहन खरेदी करू शकतात किंवा नवीन संपत्ती खरेदी करू शकतात. सामाजिक कार्यांमध्ये हे लोक मग्न होतील. हे लोक दान पुण्य करणार. धार्मिक यात्रांवर हे लोक जाऊ शकतात. हे लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी मंगळचा गोचर लाभदायक ठरू शकतो. या दरम्यान या लोकांचे धाडस आणि आत्मविश्वास वाढणार आहे. दीर्घकाळापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकतात. या लोकांना आईवडिलांचे सहकार्य लाभणार. व्यवसाय वाढवण्यासाठी कुटुंबाला घेऊन मोठा निर्णय घेऊ शकतात. सार्वजानिक क्षेत्रात या लोकांना मान सन्मान प्राप्त होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)