Mangal Gochar In Aries: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. मंगळ ग्रह १ जून रोजी आपल्या स्वराशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे मेष राशीतील हे परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास ठरणार आहे.

२३ एप्रिल रोजी मंगळ ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला होता; तो १ जूनपर्यंत या राशीत असेल. त्यानंतर त्याचे राशी परिवर्तन मेष राशीत होताच तीन राशींना आर्थिक लाभ होतील.

Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा

मेष

मंगळ मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर नेहमीच मंगळाची कृपा असते. मेष राशीतील राशी परिवर्तनात मंगळ मेष राशीच्या लग्न स्थानात असेल; ज्याच्या प्रभावाने या व्यक्तींचा साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

धनु

धनु राशीच्या व्यक्तींनादेखील मंगळाच्या मेष राशीतील परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. कारण- हे संक्रमण धनु राशीच्या पाचव्या घरात होईल. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.

हेही वाचा: भाग्य चमकणार अन् नशीब पालटणार, १० मे पासून ‘या’ चार राशींच्या व्यक्तींना मिळणार कष्टाचे फळ; बुध देणार बक्कळ पैसा!

मीन

मेष राशीतील मंगळाचे संक्रमण मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फळ देणारे असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. )

Story img Loader