Mangal Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ग्रहांचा सेनापती असून त्यास शौर्य, पराक्रम, विवाह, जमीन-वाहन याचा कारक मानले जाते. १ जुलै २०२३ मंगळ राशी परिवर्तन करून सिंह राशीत प्रवेश घेणार आहे. पुढील दीड महिना म्हणजेच २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत मंगळ सिंह राशीत कायम असणार आहे. यामुळे मंगळाचा १२ राशींवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव दिसून येणार आहे. काही राशींना कष्टात वाढ झाल्याचे अनुभव येऊ शकतात तर काहींना सोन्याहून पिवळा सुखाचा काळ वाट्याला येऊ शकतो. मंगळ गोचरसह एकूण पाच राशींना भाग्योदयाचे योग आहेत. या मंडळींना नेमका कसा धनलाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया….

मंगळ गोचर होताच ‘या’ राशींचे नशीब बदलणार?

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

मेष राशीसाठी मंगळाचे गोचर हे अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. येत्या काळात आपल्याला साहस व पराक्रमात वाढ झाल्याचे अनुभव येऊ शकतात. आपल्याला हातात घेतलेल्या सर्व कामांमध्ये यश व प्रगतीचे संकेत आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असलेल्या मंडळींना यश लाभू शकते. नोकरदार मंडळींना ज्युनिअर्सच्या मदतीतून नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळू शकते ज्याचा थेट प्रभाव तुमच्या पगारवाढीवर सुद्धा होऊ शकतो. परदेशप्रवासाचे योग आहेत. प्रॉपर्टीच्या खरेदी- विक्रीशी संबंधित मंडळींना सुद्धा नव्या लोकांशी संपर्क वाढवण्याची संधी मिळू शकते ज्याचा मोठा लाभ होईल.

Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख
Venus and Rahu yuti in meen rashi
शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

आपल्या राशीतील रवी बुधाचा योग आपली बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यांचे योग्य सादरीकरण करण्यासाठी पूरक आहे. अशात मंगळाची साथ लाभल्याने स्वतःचे विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकाल व आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवाल. नोकरी व्यवसायात लाभदायक घटना घडतील. शुक्र मंगळाचा शुभ योग आवश्यक इतका आत्मविश्वास देईल. आर्थिक समस्या दूर होतील. विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळेल. जोडीदारासह खटके उडले तरी त्यांचे वादात रूपांतर होणार नाही.

कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)

कर्क राशीच्या लोकांना मंगळ गोचर होताच वाडवडिलांच्या संपत्ती व गुंतवणुकीचा मोठा लाभ होऊ शकतो. तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर मोठा लाभ होऊ शकतो अन्यथा आपण आतापासूनच एखाद्या व्यवसायात गुंतवणूक सुरु करू शकता. वडिलांचे सहकार्य मिळून तुम्हाला डोक्यावरचे खूप मोठे ओझे उतरल्याचे वाटू शकते.

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

मंगळ गोचर होताच सिंह राशीच्या प्रगतीचा वेग वाढू शकतो. या मंडळींच्या व्यक्तिमत्वात एक विशेष लाभ प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. तुम्ही अत्यंत उर्जावान राहू शकाल. तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढण्याची संधी मिळू शकेल ज्याचा पुरेपूर वापर करून घ्या. समाजात तुमचा मान- सन्मान वाढू शकतो. धनाची देवाणघेवाण करताना विशेष काळजी घ्या.

हे ही वाचा<< ‘या’ राशी जुलै महिन्यात होणार अपार श्रीमंत? आषाढी एकादशी पासून तुमचेही अच्छे दिन? वाचा १२ राशींचे मासिक भविष्य

मीन रास (Pisces Zodiac Horoscope)

मीन राशीला मंगळ ग्रह आयुष्यात एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला परदेश प्रवासाची चिन्हे आहेत, यात्रेत- जत्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुमच्या आयुष्यात उत्साह वाढू शकतो. तुमच्यातील नेतृत्व कौशल्य विकसित होऊ शकते त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू समजू नये)

Story img Loader