Ruchak Rajyog 2024: नवग्रहांचा सेनापती आणि पराक्रमी ग्रह मानला जाणारा मंगळ लवकरच राशीपरिवर्तन करतो आहे. मंगळ ग्रह साहस, शक्ती, ऊर्जा देणारा ग्रह आहे. आताच्या घडीला मंगळ मीन राशीत आहे. जून महिन्यात मंगळ मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष रास ही मंगळाची रास मानली जाते. ०१ जून २०२४ रोजी दुपारी मंगळ ३:५१ वाजता स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करेल. या राशीत मंगळदेव १२ जुलैपर्यंत असतील. मंगळ ग्रहाने मेष राशीत प्रवेश केल्यावर ‘रुचक राजयोगा’ची निर्मिती होईल. ज्योतिषशास्त्रात हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया या नशिबान राशी कोणत्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींचे नशिब पालटणार?

कर्क राशी

मंगळाचे गोचर कर्क राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. नोकरी शोधत असाल, तर त्या संदर्भात चांगली बातमी मिळू शकते. मनासारखी नोकरी या काळात मिळू शकते. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगती दिसून येऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकतो. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे या काळात अचानक परत मिळू शकतात. व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. आर्थिक प्रगती होऊन भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात गोडवा येऊ शकतो.

(हे ही वाचा : ७ दिवसांनी ‘या’ ४ राशींचे दिवस बदलतील? चार शुभ राजयोग घडून येताच माता लक्ष्मीच्या कृपेने श्रीमंती चालून येईल दारी!)

वृश्चिक राशी

नोकरदार व्यक्तींना बढतीसह पगारवाढही मिळण्याची शक्यता आहे. पैसा कमावण्याचे विविध पर्याय सापडू शकतात. तसेच व्यवसायिकांना धनलाभ होऊ शकतो. उद्योगधंद्याचा विस्तारही करू शकता. रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न असेल तर ते पूर्ण होऊ शकतं. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. हातात पुरेसा पैसा आल्याने आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. जुन्या मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेटी जुळून येऊ शकतात. कुटुंबातील जुने मतभेद दूर होऊन आनंदी वातावरण निर्माण होऊ शकतो.

धनु राशी

या कालावधीत नशिबाची साथ मिळून प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. नोकरदार व्यक्तींना बढती मिळू शकते. या कालावधीत अचानक धनलाभाचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले असतील, तर तेही या काळात परत मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतही गूड न्यूज मिळू शकते. विवाहेच्छुकांना जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये आनंदी वातावरण राहू शकतो. घरामध्ये धार्मिक कार्य घडून येऊ शकतात त्यामुळे मन प्रसन्न राहील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangal gochar mars transit mesh rashi ruchak rajyog positive impact on these zodiac sing can get huge money pdb