ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशि बदलत असतो. त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होत असतात. असं असलं तरी जन्मावेळी असलेल्या ग्रहांची स्थितीही तितकीच महत्त्वाची असते. त्यावरून ग्रहांची महादशा आणि काळ वेळ जुळून येणं गरजेचं असतं. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाचं राशि परिवर्तन महत्त्वपूर्ण मानलं जातं. मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती आणि भूमिपुत्र मानलं जातं. मंगळ ग्रह १६ जानेवारी २०२२ रोजी एका राशितून दुसऱ्या राशित गोचर करणार आहेत. मंगळ धनु राशित येणार असल्याने काही राशिंवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.
मेष: मंगळ ग्रहाच्या राशि परिवर्तनामुळे चांगले परिणाम येतील. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच समाजात मान सन्मान वाढेल. गुंतवणुकीच्या संधी मिळतील. मेष राशीच्या लोकांवर मंगळ देवाची विशेष कृपा असून ही मंगळाची रास आहे. त्यामुळे त्यांना करिअरमध्ये यश मिळेल.
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना या काळात लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि धंद्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू भक्कम होण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. तसेच नवा व्यवसाय सुरु करण्यास अनुकूल काळ आहे.
Shani Gochar 2022: या राशीच्या लोकांनी व्हा सावध; कारण सुरु होतोय शनि साडेसातीचा काळ
कन्या: या राशिच्या लोकांची मंगळ ग्रह परिवर्तनामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनातील कलह कमी होतील. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. तसेच अचानक धनप्राप्ती होईल. तसेच व्यवसायात मोठी डील करण्याची शक्यता आहे.
मीन: मीन राशिच्या लोकांनाही राशि परिवर्तनामुळे लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात कार्यक्षेत्रात यश मिळेल. तसेच विस्कटलेली आर्थिक घडी सुधारेल. शत्रूंवर विजय मिळवण्यात यश मिळेल. मेहनतीला यश मिळताना दिसेल.