ज्योतिषशास्त्रानुसार सर्व नऊ ग्रह कमी अधिक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतात. प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीपर्यंत एका राशीत असतात. त्यामुळे कधी कधी एका राशीत दोन किंवा त्यापेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात. या विशिष्ट योगामुळे मानवी जीवनावर परिणाम होतात. चंद्र सव्वा दोन दिवस एका राशीत असतो आणि त्यानंतर राशी बदलतो. तर शनि अडीच वर्षानंतर राशी बदलतो. ग्रहांमध्ये सेनापतींचा दर्जा असलेल्या आणि भूमिपुत्र मंगळ ग्रह २६ फेब्रुवारीला राशी परिवर्तन करत आहे. शनिदेवांच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात या चार राशी कोणत्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेष : मकर राशीत मंगळाचा प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देऊ शकतो. मंगळ ग्रह दहाव्या भावात म्हणजेच मेष राशीच्या लोकांच्या कर्म भावात प्रवेश करेल. मंगळ हा मेष राशीचा अधिपती ग्रह आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला नवीन ठिकाणी काम करायचे असेल तर संधी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि आर्थिक प्रगती दोन्ही होऊ शकते. जर तुमचा व्यवसाय असेल तर मंगळाचे हे संक्रमण तुम्हाला आर्थिक लाभ देऊ शकते.

वृषभ : ग्रहांचा सेनापती मंगळाचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर परिणाम देईल. मंगळ ग्रह वृषभ राशीच्या नवव्या घरात म्हणजेच भाग्य स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक बाजूही मजबूत राहील. वृषभ राशीचे लोक व्यवसायात गुंतवणूक करण्यास इच्छुक असतील तर हा काळ अनुकूल राहील.

Astrology 2022: ‘या’ महिन्यात पाच ग्रहांचा मकर राशीत महासंयोग, तीन राशींना होणार आर्थिक लाभ

धनु: मंगळाचे संक्रमण धनु राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. मंगळ ग्रह धनु राशीच्या दुसऱ्या घरात म्हणजेच धनस्थानात प्रवेश करेल. त्यामुळे कला क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना विशेष लाभ मिळू शकतो. यासोबतच तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर त्यातही तुम्हाला अचानक फायदा होऊ शकतो.

मीन: मंगळाचे संक्रमण मीन राशीच्या लोकांची आर्थिक बाजू भक्कम करेल. मंगळ ग्रह मीन राशीच्या अकराव्या भावात म्हणजेच उत्पन्नाच्या ठिकाणी प्रवेश करेल. यामुळे मीन राशीच्या लोकांना अनेक ठिकाणाहून आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचा व्यवसाय असेल तर तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. मीन राशीचा स्वामी गुरू आणि मंगळ यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे मंगळाचे हे भ्रमण तुम्हाला आर्थिक समृद्धी देईल.