वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि या ग्रहाला महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर मंगळ हा ग्रह येतो. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम बारा राशींवर होतो. एप्रिल महिना खूप खास असणार आहे, त्यात सर्व ग्रहांचे संक्रमण होणार आहे. या महिन्यात राशी बदलणारा मंगळ पहिला आहे. मंगळ हा ग्रह युद्ध आणि रक्ताचा कारक असून कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. पंचांगानुसार मंगळ ग्रह ७ एप्रिल २०२२ रोजी दुपारी २ वाजून २४ मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे कुंभ राशीत संक्रमण १७ मे २०२२ पर्यंत राहणार आहे. यानंतर मंगळ कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. चला जाणून घेऊया की ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांना खूप काळजी घ्यावी लागते-
मेष: मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने मेष राशीच्या लोकांना संक्रमण काळात काळजी घ्यावी लागेल. काही कामात यश तर काही कामात अपयश येऊ शकते. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात, नात्यात कटुता वाढण्याची शक्यता आहे. चुकीच्या कामात किंवा कायदेशीर अडचणीत येण्याचे टाळा. असं असलं तरी नोकरीत बढतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मंगळाचे संक्रमण वैवाहिक जीवनासाठी चांगले राहील आणि नोकरी-व्यवसायात विशेष यश अपेक्षित आहे.
वृश्चिक: ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचा स्वामी देखील मंगळ आहे. मंगळ संक्रमणादरम्यान आपल्या बोलण्यावर आणि रागावर विशेष नियंत्रण ठेवावे लागेल. नातेसंबंध बिघडल्याने तुमच्या स्वभावात बदल होऊ शकतो. याशिवाय सासरच्या लोकांशी वाद आणि संबंध खराब करू नका. संकटातून बाहेर पडण्यासाठी जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाद टाळण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात.
Gudipadwa 2022: हिंदू नववर्षात शनिदेव राजा, तर बृहस्पती मंत्रिपदी; या राशींचं नशिब उजळणार
कुंभ: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ कुंभ राशीत शनिच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे संक्रमणाचा सर्वाधिक परिणाम कुंभ राशीवर होणार आहे. या काळात तुम्हाला राग येण्याची अनेक प्रसंग येतील. तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जेवणात निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो, यासोबतच शत्रूंपासून सावध राहा.