Mangal Nakshatra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा एका राशीतून दुसऱ्या राशीत किंवा एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश होताच त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ग्रहांच्या राशी आणि नक्षत्रांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव विविध राशींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. नुकताच ऊर्जा आणि साहसाचा कारक ग्रह असलेल्या मंगळ ग्रहाने रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे, या राशीत तो १५ ऑगस्टपर्यंत विराजमान असेल. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी मंगळ मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करील; ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पडेल. या नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने व्यक्तींच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल आणि आर्थिक समस्यादेखील दूर होतील.
मंगळाचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश (Mangal Nakshatra Gochar 2024)
मेष
मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल आणि या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यात तत्पर असाल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. तुमच्यामध्ये साहस, आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. अनेकांची मने जिंकाल. त्यामुळे वेळोवेळी प्रियजनांकडून तुमचे कौतुक होईल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.
वृषभ
मंगळाचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप सकारात्मक सिद्ध होईल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल. या काळात कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण व्यतीत कराल. उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
हेही वाचा: १८ वर्षानंतर सूर्य-केतूची होणार युती; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा
मकर
मकर राशीच्या व्यक्तींसाठीदेखील मंगळाचा रोहिणी नक्षत्रातील प्रवेश खूप लाभदायी ठरेल. या काळात मानसिक शांती लाभेल आणि मन प्रसन्न राहील. समाजात प्रभावशाली व्यक्तींबरोबर ओळख वाढेल; ज्याचे फळ भविष्यात मिळेल. परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांशी संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)