Mangal Rashi Parivartan Samsaptak Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह मार्गी होतात किंवा वक्री होऊन इतर राशीत गोचर करतात तेव्हा त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष प्रभाव हा सर्वच राशींमध्ये दिसून येतो. विशेषतः काही शक्तिशाली ग्रह, जसे की शनि किंवा मंगळ जेव्हा अन्य राशीत मार्गक्रमण करू लागतात तेव्हा सर्व १२ राशींना शुभ- अशुभ परिणाम जाणवू शकतात. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार मंगळ ग्रहाने मेष राशीतून मार्गक्रमण करून वृषभ राशीत प्रवेश घेतला आहे तर दुसरीकडे शुक्र ग्रह व बुध ग्रहांनी वृश्चिक राशीत प्रवेश घेतला आहे. मंगळ, शुक्र व बुध राशीच्या संगमाने काही राशींच्या कुंडलीत समसप्तक योग निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समसप्तक योग हा अत्यंत शुभ व दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो. ज्या राशी व नक्षत्रांमध्ये हा योग तयार होतो त्यांच्यावर मंगळ ग्रहाचा वरदहस्त असतो असे मानले जाते, ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार मंगळ ग्रह हा ऊर्जा, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, शौर्य यांचा कारक आहे त्यामुळे मंगळाच्या आशिर्वदाने या राशींच्या आयुष्यात मंगल दिवसांची सुरुवात होऊ शकते. या नशीबवान राशी कोणत्या आहेत व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे आपण पाहुयात…

कन्या

कन्या राशीच्या मंडळींसाठी समसप्तक योग हा अत्यंत शुभ ठरू शकतो. आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत तृतीय स्थानी समसप्तक योग तयार होत आहे हे स्थान भाग्याचे मानले जाते. समसप्तक योग हा भावंडांसह नाती सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कौटुंबिक सुखामुळे तुमचे येणारे काही दिवस आनंदी जाऊ शकतात. तसेच वैयक्तिक स्तरावरही आपल्याला आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात हवे तसे यश व प्रगती लाभल्याने आपला येणारा काळ हा सुख व समृद्धी घेऊन येणारा ठरू शकतो.

यंदा मार्गशीर्ष गुरुवार कधी सुरु होत आहेत? महालक्ष्मी व्रताची तिथी, महत्त्व व पूजा विधी जाणून घ्या

वृश्चिक

समसप्तक राजयोग हा वृश्चिक राशीसाठी लाभदायक ठरू शकतो. आपल्याला जोडीदाराचे प्रेम व सहवास लाभण्याचे योग आहे, विवाहयोग्य व्यक्तींना लग्न जुळण्याबाबत शुभ वार्ता लवकरच मिळू शकते. जोडीदाराच्या हुशारीमुळे आपल्याला आर्थिक लाभ सुद्धा होय शकतो. कोर्टाच्या खेपा होण्याचे सुद्धा संकेत आहेत मात्र कोर्टाचे निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता अधिक आहे. कामाच्या निमित्ताने परदेशी प्रवासाची संधी येऊ शकते.

मकर

मकर राशीसाठी समसप्तक योग हा धनसंपत्ती कमावण्याचा सुवर्ण योग ठरू शकतो. आपल्या राशीत शुक्र देव गोचर करुन अत्यंत मोक्याच्या ठिकाणी स्थिर होणार आहेत. विशेषतः जर आपला व्यवसाय असेल तर नवनवीन सहकारी जोडले जाण्याची शक्यता आहे.

२०२३ पासून शनिचा कुंभ राशीत प्रवेश; नववर्षात ‘या’ राशींमध्ये सुरु होणार साडेसाती व ढैय्याचा प्रभाव

मीडिया व विशेषतः अभिनय क्षेत्रात नशीब आजमावू पाहणाऱ्यांना हा काळ नवीन संधी घेऊन येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangal graha margi creates samsaptak raj yog ma lakshmi blessing three zodiac signs with immense power and money svs