Guru Mangal Yuti In Vrushbh: मंगळ ग्रह सध्या आपल्या स्वराशीत म्हणजेच मेषमध्ये भ्रमण करत आहे. १२ जुलैला मंगळाचे वृषभ राशीत परिवर्तन होणार आहे. वृषभ राशीत ४६ दिवस मंगळ देव वास्तव्याला असतील जिथे गुरुसह मंगळाची अत्यंत लाभदायक अशी युती होणार आहे. यानंतर थेट २६ ऑगस्टला मंगळाचे मिथुन राशीत गोचर होईल. साधारण दीड महिना तर वृषभ राशीत राहून मंगळ काही राशींच्या नशिबाला कलाटणी देण्याच्या प्रयत्नात असेल. या नशिबवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..

गुरु मंगळ युतीमुळे ‘या’ राशींना नशिबाची पावलोपावली मिळेल साथ

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

राशी चक्रातील प्रथम राशीचे स्वामी मंगळ आपल्या राशीत आल्याने आपल्याला या दीड महिन्याच्या कालावधीत प्रचंड ऊर्जा, शक्ती प्राप्त होऊ शकते. यामुळे कदाचित काहीवेळा आपला पारा सुद्धा वाढू शकतो पण रागावर नियंत्रण ठेवणेच आपल्या हिताचे असेल. सुख सुविधा वाढू शकतात व आपण त्यासाठी भरपूस खर्चही कराल. जाणारे पैसे वेगवेगळ्या मार्गाने पुन्हा आपल्याकडे परतण्याची चिन्हे आहेत. आपलयाला नोकरीच्या ठिकाणी समाधानकारक फायदे मिळू शकतात. तर व्यायवसायिकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. आर्थिक मिळकत वाढवण्याच्या अधिकाधिक संधी मिळतील. जोडीदारासह उत्तम नाते टिकवून ठेवा. या कालावधीत धार्मिक यात्रेचा योग आहे. आरोग्याच्या अडचणी दूर होतील. वाहन सांभाळून चालवावे.

Rahu In Shani Nakshatra Gochar 2024
शनीच्या नक्षत्रात सोन्याचे दिवस, ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होणार सुरु; तुम्हाला कशी लाभेल श्रीमंती?
Budh Gochar 2024
आजपासून ‘या’ ५ राशींचा सुवर्णकाळ सुरू, हाती येणार अमाप पैसा? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात गडगंज श्रीमंत
masik rashifal july 2024 very lucky for 5 zodiac signs
जुलै महिना या ५ राशींसाठी ठरेल वरदान! मिळेल सुवर्णसंधी आणि राजवैभव
1st July 2024 Panchang And Rashi Bhavishya Mesh To Meen Which zodiac signs will be blessed by Lord Shiva Read Daily Marathi horoscope
१ जुलै पंचांग: व्यवसायात भरघोस वाढ ते कौटुंबिक सौख्य; १२ पैकी या राशींवर राहील शंकराची कृपा; वाचा ‘सोमवार’चे तुमचे राशिभविष्य
Surya Shukra yuti
जुलैपासून ‘या’ राशींचे गरिबीचे दिवस संपणार, अच्छे दिन होणार सुरु? २ ग्रहांची शुभ युती घडून येताच होऊ शकते धनवर्षा
Shukra Nakshatra Parivartan
१८ जूनपासून ‘या’ ४ राशी होतील आनंदी? शुक्रदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाने श्रीमंत होण्याची संधी चालत येऊ शकते तुमच्या दारी
Budh Gochar 2024
३ दिवसांनी ‘या’ राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, हाती येणार अमाप पैसा? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात गडगंज श्रीमंत
Budh Vakri 2024
वाईट काळ संपणार! ४७ दिवसांनी ‘या’ राशींचा सुरु होतोय सुवर्णकाळ? बुधदेवाची वक्री चाल तुम्हाला देऊ शकते अपार श्रीमंती

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीच्या गोचर कक्षेत मंगळाच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील. गुरुचा प्रभाव दांडगा असेल. कोर्टाच्या खटल्यांमध्ये आपल्या बाजूने निकाल लागू शकतो. व्यवसायाच्या संधी चालून येतील. अडकून पडलेले पैसे परत मिळतील. आपल्याला प्रयत्नांचे उत्तम फळ मिळू शकते. आजवर आपण ज्या गोष्टीसाठी संघर्ष केलात ती गोष्ट अखेरीस आपल्या पदरात पडेल. सासरकडच्या मंडळींची मने जपावी लागतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ व नातेवाईकांमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य मोलाचे ठरेल. वडिलांच्या रूपात धनलाभाची सुद्धा चिन्हे आहेत.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीला करिअरमध्ये एखादी मोठी उडी घेता येईल असा हा कालावधी आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. अडकून पडलेली कामे मार्गी लागू शकतात. या कालावधीत नशिबाची साथ लाभल्याने आपल्या कर्माचे फळ मिळू शकते. पगारवाढीचा योग आहे. कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. मान- प्रतिष्ठा वाढू शकते. वैवाहिक जीवनात आनंद उपभोगाल. जमिनीशी संबंधित कामे मार्गी लागतील. धार्मिक गोष्टींची आवड लागेल. यात्रेचे योग आहेत.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

मंगळ हा पराक्रमी ग्रह मानला जातो. आपल्या राशीत मंगळाचा प्रभाव असल्याने आपल्याला या कालावधीत साहसी कार्य करण्याची इच्छा होईल व त्यानुसार काही पाऊले सुद्धा तुमच्याकडून उचलली जातील. नोकरीत बदलाचे संकेत आहेत. आपल्याला प्रगतीच्या दृष्टिकोनातून काही बंध मोडून पुढे यावे लागली. नव्या व्यवसायाची सुरुवात होऊ शकते. वादग्रस्त मुद्दे तुमच्या हस्तक्षेपापमुळे सोडवले जातील. भौतिक सुख लाभू शकते. प्रॉपर्टी किंवा वाहनांची खरेदी कराल. एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करू शकाल ज्यातून समाधान मिळेल. जोडीदाराच्या रूपात धनप्राप्तीची संधी मिळू शकते.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मागच्या दाराने येणारी खोटी आपुलकी, प्रेम यात जास्त गुंतू नका. समोरच्याला ओळखण्याचे कसब अंगी असू द्या. म्हणजे मनस्तापाची पाळी येणार नाही. विशेषतः आरोग्याची काळजी घ्या. गुरु- मंगळ आपल्यावर विशेष कृपादृष्टीने पाहत आहे. त्यामुळे तूर्त चिंता नको. मंगळाच्या राश्यांतरानंतर चांगले दिवस, चांगले क्षण जवळ येतील. अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण होऊ शकते. संततिसुख प्राप्त होऊ शकते. गुंतवणूकीवर भर द्या.

हे ही वाचा << शनीच्या नक्षत्रात सोन्याचे दिवस, ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होणार सुरु; तुम्हाला कशी लाभेल श्रीमंती?

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

मीन राशीच्या मंडळींना नोकरीच्या निमित्ताने परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. करिअरमध्ये नवे पद व प्रतिष्ठा मिळवता येईल. एकाहून अधिक मार्गाने पैसे कमावू शकता. व्यापारी वर्गाचे नवे संपर्क जोडले जातील. कौटुंबिक वादातून मुक्त व्हाल. घरात शुभ कार्याची नांदी होईल. लग्नाचे योग आहेत. भाग्य साथ देणार असल्याने अडकून पडलेले पैसे परत मिळतील. भावंडांशी जुळवून घ्यावे लागेल. इतरांना सल्ला देताना थोडं भान बाळगा. लहानमोठया दुखापती होणार नाहीत असे पाहा.

(टीप: वरील लेख हा गृहीतले व प्राप्त माहितीवर आधारित आहे)