Mangal Margi 2023: नवीनवर्ष म्हणजेच २०२३ आता अवघ्या काहीच दिवसांच्या अंतरावर आहे, या नववर्षात अनेकांच्या आयुष्यात काही पूर्वनियोजित तर काही अनपेक्षित बदल घडून येतील हे साहजिक आहे. तुमच्या आयुष्यातील या नव्या टप्प्यात तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार का हे आज आपण पाहणार आहोत. ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांच्या माहितीनुसार २०२३ हे नववर्ष अनेक राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. येत्या नववर्षात पहिल्याच महिन्यात मंगळ ग्रह मार्गी होणार आहे परिणामी अनेक राशींच्या भाग्यात सुखाचा काळ सुरु होऊ शकतो.
ज्योतिषीय अभ्यासकांच्या माहितीनुसार ३० ऑक्टोबरला मंगळ ग्रह मिथुन राशीत वक्री झाले होते तर येत्या वर्षात १३ जानेवारीला मंगळ वृषभ राशीत मार्गी होणार आहेत. मंगळाच्या या राशी परिवर्तनाने काही राशींसाठी प्रगतीचा काळ सुरु होणार आहे . वृषभ राशीत मंगळ गोचर होताच लाभ होणाऱ्या राशींमध्ये तुमचा समावेश आहे का पाहुयात..
कुंभ (Mangal Gochar 2023)
कुंभ राशीच्या मंडळींसाठी मंगळ गोचर अत्यंत शुभ काळ व सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. नोकरदार मंडळींचे कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकते. तुमच्या खांद्यांवर नवीन जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते पण त्याचा लाभ तुमच्या आर्थिक मिळकतीत होऊ शकतो. तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मानसिक शांतीसाठी मदत करू शकतो. नवीन प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी अनुकूल काळ सुरु होऊ शकतो.
कर्क (Mangal Margi 2023)
कर्क राशीच्या मंडळींच्या भाग्यात मंगळ ग्रह मार्गी होऊन सुखाचे चार क्षण घेऊन येऊ शकतो. तुम्हाला मेहनतीचे गोड फळ मिळू शकेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. व्यवसायात प्रचंड नफा कमावण्याची संधी आहे. यावेळी तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीने विचार करायला विसरू नका. तुमच्या कुटुंबात लवकरच एक नवीन पाहुणा येऊ शकतो ज्यामुळे भाग्य उजळण्याचे योग आहेत. तुमचे खाजगी आयुष्य या पुढील काळात सुखाने समृद्ध होऊ शकते.
हे ही वाचा<< १ जानेवारी पासून गुरु ‘या’ ३ राशींना देणार प्रचंड धनलाभाची संधी; ६ महिने अमाप पैसे कमावू शकतील ‘ही’ मंडळी
मकर (Grah Gochar 2023)
मंगळ देव सरळ चाल करून मकर राशीच्या प्रभाव कक्षेत आपला परिणाम दाखवून देतील, यामुळे नोकरीत लाभाचे योग आहेत. करिअरमध्ये प्रगतीसाठी येणारा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो. तुम्हाला या काळात तुमची नाती मजबूत करण्याकडे लक्ष द्यायला हवे.
हे ही वाचा<< अष्टलक्ष्मी राजयोग बनल्याने ‘या’ तीन राशींचे ‘अच्छे दिन’ होणार सुरु? २०२३ मध्ये अमाप पैसे व अपार श्रीमंतीचे योग
मीन (Gochar 2023)
जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला या काळात नक्कीच यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. नोकरीतही तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. मीं राशीच्या मंडळींच्या कुंडलीत विवाहाचे योग आहेत. तुमचे आरोग्य सुधारून सुदृढ जीवन जगता येईल.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे)