Mangal Margi 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळानंतर विविध राशीत मार्गी किंवा वर्की होत असतात. ज्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. अशात मंगळ कर्क राशीत वक्री चाल करत आहे. नवीन वर्ष २०२५ च्या २१ जानेवारी रोजी मंगळ कर्क राशीत सरळ मार्गस्थ होईल, यामुळे काही राशींचे भाग्य झटक्यात उजळू शकते. त्या राशींच्या संपत्ती आणि सुखातही वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया, या भाग्यशाली राशींविषयी…
मंगळाचे राशी परिवर्तन ‘या’ राशींना करेल श्रीमंत, प्रत्येक कामात मिळवून देईल यश? (Mangal Margi 2025)
मीन
मंगळाचे मार्गी होणे मीन राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तुम्ही एखादे वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णयदेखील घेऊ शकता. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. जास्त विचार करू नका. मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळू शकेल. दुसरीकडे, जर तुमचा व्यवसाय रिअल इस्टेट, प्रॉपर्टीशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुमचे आईबरोबरचे नाते चांगले राहील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे मार्गी होणे फलदायी ठरू शकते. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ दिसून येईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. तसेच तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
u
धनु
मंगळाचे मार्गी होणे धनुसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहील. तुमच्या जोडीदाराला प्रत्येक कामात यश मिळेल, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यापाऱ्यांना व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. भागीदारीच्या कामात फायदा होईल.
(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)