Mangal Margi 2025: ग्रहाचे सेनापती मंगळ एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात ज्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. मंगळ हा पराक्रमी, योद्धा, भूमि पुत्र म्हणून ओळखला जातो. धाडसी आणि आत्मविश्वासाचा प्रतिक मानला जातो. मंगळ सध्या वक्री अवस्थेत आहे. पण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी २४ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी मंगळ मिथुन राशीमध्ये मार्गी होणार आहे. मंगळ सरळ चालत असल्याने पुन्हा एकदा शक्तिशाली होणार ज्याचा थेट परिणाम काही राशींवर दिसून येईल. या राशींचे नशीब चमकू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
मेष राशी (Mesh Zodiac)
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळचे मार्गी होणे अतिशय लाभदायक ठरू शकते. मंगळ तिसऱ्या भावामध्ये सरळ चाल चालणार आहे. अशात या राशीच्या लोकांचे दीर्घ काळापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. तसेच भाऊ बहिणींबरोबर चांगला वेळ घालवू शकतात.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकते. तसेच शत्रू आणि प्रतिस्पर्धांवर विजय मिळवू शकतात. आई वडील, गुरू आणि मेंटर पूर्ण सहकार्य मिळवू शकते. आरोग्य उत्तम राहीन. मंगळ ग्रहाची आठवी दृष्टी दहाव्या भावात दिसून येईल. अशात करिअरमध्ये खूप लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना खूप जास्त यश प्राप्त होऊ शकते. आपल्याला नवीन संधी मिळू शकतात.
सिंह राशी (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी जीवनात मंगळ मार्गी होणे फायद्याचे ठरू शके. अशात या राशीच्या लोकांना भौतिक सुख प्राप्त होऊ शकते. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. जुन्या गुंतवणूकीतून चांगला नफा मिळू शकतो.
या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. तसेच या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना मोठे यश मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल.
वृषभ राशी (Vrishabha Zodiac)
मंगळ मार्गी होऊन या राशीच्या दुसर्या भावामध्ये विराजमान होईल. अशात या राशीच्या लोकांना अचानक धन लाभ मिळू शकतो. दीर्घ काळापासून अडकलेले कामे पूर्ण होतील. तसेच सुख सुविधांमध्ये वृद्धी होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना अपार यश मिळू शकते. या लोकांना सुख सुविधा मिळू शकतात. या लोकांच्या कामाचे कौतुक होईल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईन. जीवनात भरपूर आनंद दिसून येईल.