Mangal Transit In Taurus: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करतात. याचा प्रभाव सर्व मानवी जीवनावर दिसून येऊ शकतो. जेव्हा एखादा ग्रह तुमच्या राशीच्या कुंडलीत भाग्य स्थानी स्थिर होतो तेव्हा त्याचा प्रभाव शुभ ठरतो. प्रत्येक राशीचे स्वामी ग्रह आपापल्या राशीत प्रवेश करताना शुभ संयोग जुळवून आणतात. वृषभ राशीचा स्वामी मंगळदेव आहे. येत्या ११ दिवसात मंगळ वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. दोन महिने वृषभ राशीत स्थिर राहून १३ मार्चला मंगळ मिथुन राशीत प्रवेशाला सज्ज होऊन वक्री होणार आहेत. १३ मार्च पर्यंत ३ राशींना प्रचंड धनलाभाचे योग आहेत. या राशींना पदोन्नती व श्रीमंतीचे योग आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिंह (Leo Zodiac)

मंगळ ग्रह राशी परिवर्तन करताच सिंह राशीसाठी लाभदायक स्थिती निर्माण होत आहे. आपल्या राशीत मंगळ गोचरचा प्रभाव कर्म स्थानी दिसणार आहे. याचा अर्थ तुम्हाला नव्या नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळेच सिंह राशीला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या आर्थिक मिळकतीचे मार्ग वाढण्याची शक्यता आहे तसेच तुमच्या राशीला मान- सन्मान मिळू शकतो. आपल्याला वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. नोकरीच्या ठिकाणी कामात वैविध्य आणल्यास आपल्याला प्रगती व धनलाभ मिळू शकतो.

कर्क (Cancer Zodiac)

मंगळ देवाचे गोचर कर्क राशीसाठी आर्थिक लाभ घेऊन येऊ शकते. मंगळ देव आपल्या राशीच्या ११ व्या स्थानी स्थिर होणार आहेत. हे आर्थिक वृद्धीचे स्थान मानले जाते. आपल्याला जुन्या गुंतवणुकीतून प्रचंड धनलाभ होऊ शकतो. जी मंडळी हॉटेल व खाद्य पदार्थांशी संबंधित व्यवसायात आहेत त्यांना येत्या काळात प्रचंड पैसे मिळू शकतात. येत्या काळात तुमच्या सेव्हिंग मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी तुमच्या जोडीदाराची साथ लाभू शकते.

हे ही वाचा<< त्रिगही योग बनल्याने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? शनिदेव येत्या १३ दिवसात ‘या’ मार्गाने देणार प्रचंड धनलाभाची संधी

वृश्चिक (Scorpio Zodiac)

मंगळ ग्रह वृश्चिक राशीत सातव्या स्थानी स्थिर होणार आहे. यामुळे आपल्यासाठी लाभदायक स्थिती तयार होत आहे. येत्या काळात विवाहयोग्य तरुणांना लग्नासाठी स्थळ येऊ शकते. तुमच्या बहुतांश अपेक्षा पूर्ण करणारा योग्य जोडीदार आयुष्यात येण्याची शक्यता आहे. या जोडीदाराचा पायगुण आपल्याला धनलाभ मिळवून देऊ शकतो. व्यवसाय सुरु करण्यासाठी सुद्धा लाभदायक काळ आहे. तुम्हाला भागीदारीतून प्रचंड यश व आर्थिक लाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)