Mangal Planet Transit: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी बदलून शुभ आणि अशुभ योग बनवतात. आपणास सांगूया की मंगळ ग्रहांचा सेनापती १३ मार्च रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे विपरीत राजयोग निर्माण होणार आहे. दुसरीकडे, हा राजयोग तयार झाल्यामुळे ४ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यासोबतच अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता निर्माण होत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
मेष राशी
विपरीत राजयोग बनणे मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कारण मेष राशीचा स्वामी मंगळ तृतीय भावात प्रवेश करेल. तृतीय घरात मंगळ शुभ फळ देतो. त्यामुळे विपरीत राजयोग तयार होत आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना कर्जाचे पैसे मिळू शकतात.
कर्क राशी
विपरीत राजयोग बनून तुम्हाला चांगला धनलाभ होऊ शकतो. कारण मंगळ तुमच्या राशीतून १२व्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे संपत्तीचे योग तयार होत आहेत. यावेळी तुम्ही लॉटरी जिंकू शकता. तसेच यावेळी व्यावसायिकांना चांगली ऑर्डर मिळू शकते. ज्यामुळे प्रचंड नफा मिळू शकतो. तुमचा आदर वाढेल. व्यवसायात चांगले यश मिळू शकते. त्याचबरोबर या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक राशी
विपरित राजयोग तयार झाल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला पैसा आणि प्रगती होत आहे. कारण मंगळ तुमच्या पारगमन कुंडलीतील सहाव्या घराचा स्वामी असून आठव्या भावात विराजमान आहे. म्हणूनच यावेळी तुमच्याकडे भरपूर पैसे येतील. अडकलेले पैसे मिळतील. तसेच, तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. परंतु दुखापत आणि अपघात होण्याची देखील शक्यता आहे, ज्यामुळे आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. दुसरीकडे, नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
( हे ही वाचा: १३ आणि १५ मार्चला ‘या’ राशींचे नशिब पालटणार? मंगळ आणि सूर्य एकत्र देणार प्रचंड धनलाभाची संधी)
मकर राशी
विपरित राजयोग बनल्याने तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. कारण मंगळ तुमच्या संक्रमण कुंडलीत अकराव्या आणि चौथ्या भावाचा स्वामी आहे. त्यामुळे तुमचा व्यवसाय रिअल इस्टेट, मालमत्ता आणि जमीन-मालमत्तेशी संबंधित असेल तर चांगला नफा मिळू शकतो. तसच याकाळात तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल. तसेच यावेळी अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)