Mangal Rashi Parivartan 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार उद्या म्हणजेच १० मे २०२३ ला उद्या वर्षातील आणखी एक महत्त्वपूर्ण ग्रह गोचर होणार आहे. एकाच दिवशी दोन मोठे ग्रह आपल्या सध्याच्या स्थानावरून मार्गी होऊन राशी परिवर्तन करणार आहे. साहस- पराक्रम व विवाह योगाचा कारक ग्रह मंगळ मिथुन राशीतून निघून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. १ जुलै २०२३ पर्यंत कर्क राशीत मंगळ राहणार आहे. तर ग्रहांचा राजा बुध देव सुद्धा मेष राशीत उदय स्थितीत येणार आहेत. या महत्त्वपूर्ण ग्रह गोचरचा प्रभाव हा सर्व १२ राशींवर दिसून येऊ शकतो. दरम्यान अशा चार राशी आहेत ज्यांना मंगळ गोचर व बुध उडायचा सर्वाधिक लाभ प्राप्त होऊ शकतो. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा फायदा होणार हे पाहूया…

उद्यापासून पुढील ४ महिने ‘या’ राशींचे भाग्य उजळणार?

वृषभ रास (Taurus Zodiac)

मंगळ गोचर व बुध उदय वृषभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे आपण हितशत्रूंना मात देऊ शकता. आपल्याला आयुष्यात प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. तुम्ही ज्या पदासाठी किंवा प्रगतीसाठी आजवर काम करत आला आहात ते यश लवकरच तुमच्या दाराशी चालून येऊ शकते. या काळात वादापासून विचारपूर्वक लांब राहा. तुम्ही काही स्थितींमध्ये मौन बाळगून मान- सन्मान मिळवू शकता.

Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
2025 ruled by Mars
२०२५ वर मंगळ ग्रहाचे वर्चस्व; ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती कमावणार पैसा, प्रसिद्धी आणि आत्मविश्वास
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी
shukra vakri 2025
२०२५ मध्ये शनीसह हे चार ग्रह देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींचा सुरू होणार सुवर्ण काळ
Mangal Gochar 2025
मंगळ करणार मिथुन राशीमध्ये गोचर, ‘या’ चार राशींचे चमकणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Budh Margi 2024
आजपासून बुधाचा जबरदस्त प्रभाव देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान

सिंह रास (Leo Zodiac)

मंगळ गोचर व बुध उदय सिंह राशीच्या मंडळींसाठी काही आनंदाच्या वार्ता घेऊन येऊ शकते. आपल्या स्वप्नपूर्तीचा हा काळ ठरू शकतो. तुम्हाला लांबच्या प्रवासाचे योग आहेत. कामाचा अतिरेक झाल्यास प्रचंड थकवा येऊ शकतो त्यामुळे काही प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात पण तुम्ही मनाने फार आनंदी असू शकता. तुम्हाला कोर्टाच्या खटल्यांमध्ये निकाल तुमच्या बाजूने मिळू शकतो. आर्थिक गुंतवणुकीवर भर देणे फायद्याचे ठरू शकते.

कन्या रास (Virgo Zodiac)

मंगळ व बुध कन्या राशीच्या मंडळींना मोठा धनलाभ मिळवून देऊ शकतात. तुम्हाला गुंतवणुकीचे अनपेक्षित व अचानक फायदे मिळू शकतात. धनलाभ व कामाच्या ठिकाणी प्रगती यामुळे तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धी होऊ शकते. तुमचे विरोधक तुमच्या गुणांमुळे तुमच्याच बाजूने उभे राहतील अशी ही वेळ ठरू शकते. प्रवासाचे योग आहेत.

हे ही वाचा<< ‘या’ राशींमध्ये बनतोय बुधादित्य राजयोग; पुढील १२ आठवडे बक्कळ धनलाभ व अपार पैसे मिळण्याची संधी

कुंभ रास (Aquarius Zodiac)

१० मे २०२३ ला ग्रह गोचर होताच कुंभ राशीला करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते याचा प्रभाव तुमच्या पगाराच्या आकड्यावर सुद्धा होऊ शकतो. आर्थिक मिळकतीसह खर्च सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेट काटेकोरपणाने पाळा. तुम्हाला भागीदारीतून प्रचंड फायदा होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader