वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्यावेळी त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. जून महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप खास असणार आहे. कारण १५ ते ३० जून या काळात गुरु, शुक्र ते मंगळ राशीत बदल होत आहेत. गुरू-शुक्र नंतर आता २७ जून रोजी मंगळाचे राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे हे राशी परिवर्तन अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतात. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी येत्या जून महिन्यातील दिवस शुभ असणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष : तुमचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन करार निश्चित होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. जागा बदलण्याचीही शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने कोणतेही रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. व्यवसायात गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे, लाभाची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

आणखी वाचा : जुलैमध्ये शनिदेवाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ २ राशींना धैय्यापासून मुक्ती मिळेल, प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील

मिथुन: जूनच्या उरलेल्या दिवसात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. यासोबतच मुलाच्या बाजूने काही चांगली बातमीही मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. नोकरीत पदोन्नती आणि वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही पन्ना रत्न घालू शकता. जो तुमच्यासाठी लकी स्टोन ठरेल.

आणखी वाचा : गुरु ग्रह १ वर्ष प्रिय राशीत राहणार, या ३ राशींना धन आणि भाग्याची प्रबळ शक्यता

वृश्चिक: जूनचा उर्वरित काळ तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. या दरम्यान तुमच्या घरात कोणताही धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रम होऊ शकतो. व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. यावेळी तुम्ही व्यवसायानिमित्त बाहेर कुठेतरी जाऊ शकता. हा प्रवास भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमची प्रतिष्ठा आणि मान सन्मान वाढेल.

आणखी वाचा : शुक्र १३ जुलैपर्यंत प्रिय राशीत राहील, या ३ राशींना अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता

मीन: या आठवड्यात तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता किंवा गुंतवणूक करू शकता. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. घरात शांततेचे वातावरण राहील. यावेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. तसेच, बरेच दिवस रखडलेले काम पूर्ण होऊ शकते.