Graha Gochar In March 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रभाव हा सर्व राशींवर दिसून येत असतो. मार्च महिन्यात तब्बल चार ग्रहांचे काही दिवसांच्या फरकाने गोचर होणार असल्याचे समजत आहे. यातील पहिले ग्रह परिवर्तन १२ मार्चला सुरु होईल. यादिवशी शुक्र मेष राशीत प्रवेश घेणार आहे, तर या पाठोपाठ १३ मार्चला मंगळ ग्रह मिथुन राशीत प्रवेश घेणार आहे. १५ मार्च ला बुध ग्रह मीन राशीत व २८ मार्च गुरु मीन राशीत अस्त होणार आहे.
या चारही ग्रहांच्या राशी परिवर्तनाच्या वेळी कुंभ राशीतील उदयस्थितीत असणारे शनिदेव व ग्रहांचा राजा सूर्य हे उत्तम साथ देण्याच्या स्थितीत असतील. या ग्रह गोचरांनी सर्वच राशींच्या कुंडलीत कमी- अधिक परिणाम होण्याची चिन्हे आहेत. मात्र काही अशा राशी आहेत ज्यांना प्रचंड धनलाभासह प्रगतीचे योग आहेत. या भाग्यवान राशी कोणत्या चला तर पाहुयात…
गुढीपाडव्यासह ‘या’ राशींच्या भाग्यात होऊ शकते नवी सुरुवात
मेष (Aries Zodiac)
मेष राशीच्या मंडळींना आर्थिक तंगीतून मुक्ती मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात आपल्याला नव्या वाहन व घराच्या खरेदीचा योग आहे. तुम्ही सुरु केलेल्या सर्व कामांमध्ये यश लाभू शकते पण तुम्हाला प्रचंड संयमाने वागावे लागेल. याशिवाय वाणीवर नियंत्रण ठेवणेच आपल्या हिताचे ठरणार आहे. तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत असल्यास येत्या महिन्याभरात तुम्हाला संतती प्राप्तीचे योग आहेत. तुम्हाला कौटुंबिक सुखाची प्राप्ती होऊन मानसिक ताणतणाव दूर होऊ शकतो.
मिथुन (Gemini Zodiac)
मिथुन राशीच्या गोचर कुंडलीत मंगळ देव अत्यंत लाभदायक स्थितीत स्थिर होत असल्याने तुम्हाला येत्या काळात प्रचंड धनलाभाचे योग आहेत. तुम्हाला गुंतवणुकीवर खूप भर देण्याची गरज आहे. तुमच्या आईची साथ प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे लाभून मोठे संकट टळू शकते. जोडीदारासह थोडे मतभेद होऊ शकतात पण महिन्याच्या अक्षरीस प्रेमातील गोडी गुलाबी पुन्हा पाहायला मिळेल.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
वृश्चिक राशीला येत्या काळात केवळ धनलाभच नव्हे तर शाश्वत प्रगतीचे योग आहेत. तुम्हाला मागील कित्येक वर्षात केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. तुम्हाला मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नका. लक्ष्मी चंचल असल्याने तुम्ही जर का वेळीच पैसे वाचवण्याची व वाढवण्याची तरतुद केली नाही तर तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीचा मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत.
हे ही वाचा<< “देवेंद्र फडणवीस यांची कुंडली सांगते, २०२४ साठी युतीपेक्षा ‘हा’ चेहरा…” ज्योतिषतज्ज्ञांची महत्त्वाची भविष्यवाणी
धनु (Sagittarius Zodiac)
धनु राशीच्या विवाह इच्छुक मंडळींसाठी मार्च महिन्यातच लग्न जुळण्यासाठी उत्तम योग आहे. तुम्हाला कामाच्या निमित्त परदेशवारीचे योग आहेत. आरोग्याच्या बाबाबत अजिबात हेळसांड करू नका. तुमचे हितशत्रू वाढू शकतात पण तुम्हाला त्यांना प्रेमाने व गोडव्याने जिंकावे लागेल. तुमच्या भाग्यात नव्या प्रॉपर्टीच्या खरेदीचे संकेत आहेत मात्र अत्यंत सावध निर्णय घ्यावे लागतील. शेअर मार्केट येत्या काळात तुम्हाला नव्या आर्थिक मिळकतीचे मार्ग मिळवून देऊ शकते.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)