Angarki Sankashti Chaturthi 2023: हिंदू धर्मात अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष महत्त्व आहे. भगवान श्रीगणेशाच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. एका अंगारकीला व्रत केल्यावर वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे पुण्य लाभते असेही मानले जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात दोन संकष्टी चतुर्थी येतात. तर सहा महिन्यांमध्ये एकदा अंगारिकेचे मुहूर्त असतो. मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. पुराणानुसार असं म्हटलं जातं की जो कोणी या दिवशी गणेशाची पूजा करतो आणि उपवास ठेवतो, त्याला शुभ फळ प्राप्त होते. म्हणून उपवास केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंगारकी संकष्टी चतुर्थी मुहूर्त (Angarki Sankashti Chaturthi 2023 Muhurta)

द्रिक पंचांगाच्या माहितीनुसार अंगारकी चतुर्थी तिथि १० जानेवारी २०२३ ला दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी सुरु होऊन २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत हा शुभ काळ असणार आहे. तर चंद्रोदय हा रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी होणार आहे.

अंगारकी संकष्टी चतुर्थी महत्त्व (Angarki Sankashti Chaturthi 2023 Importance)

अंगारकी चतुर्थीविषयी पुराणात वेगवेगळ्या कथा आहेत. मंगळवारी येणाऱ्या गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. प्राचीन कथेनुसार, पार्वती देवीच्या सांगण्यावरून भगवान शिव जी ने हत्तीचा चेहरा आपल्या मुलाला लावला आणि त्याच नंतर त्याचे नाव गजानन झाले. या दिवशी अनेक माता आपल्या मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात.

‘या’ राशींना धनलाभाचे योग

चतुर्थी मंगळवारी असल्यास मंगळ व श्रीगणेश यांच्या आशीर्वादाने काही राशींचे भाग्य उजळू शकते. मंगळाच्या स्वामित्वाची रास म्हणजेच वृषभ, वृश्चिक व मिथुन राशीला येत्या अंगारकीला धनलाभासह प्रगतीचे योग आहेत.

हे ही वाचा<< १ वर्षाने बनलेल्या विपरीत राजयोगाने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? शनिदेव देणार मान, प्रतिष्ठा व प्रचंड धनलाभाची संधी

दरम्यान, जसं प्रत्येक महिन्याच्या कृशपक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात तसंच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात विनायक चतुर्थी साजरी केली जाते. सोबगच भाद्रपद पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. पुराणानुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी चतुर्थी साजरी केली जाते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangal transit angarki chaturthi janaury 2023 muhurta chadrodaya these zodiac signs can get huge money astrology svs