Mangal Transit 2023: वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार मंगळ हा साहस, शौर्य व वीरतेचा कारक मानला जातो. मंगळाच्या गोचरास ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. येत्या १३ मार्चला मंगळ ग्रह तब्बल पाच महिन्यांनी वृषभ राशीतून पुन्हा स्व राशीत म्हणजेच मिथुन मध्ये स्थिर होणार आहे, योगायोगाने याच वेळी मंगळ शनीच्या साथीने नवपंचम योग सुद्धा साकारत आहे. याचा प्रभाव अनेक राशींवर दिसून येणार आहे. मात्र ३ अशा राशी आहेत ज्यांच्यासाठी मंगळाचे गोचर हे अत्यंत शुभ व लाभदायक सिद्ध होऊ शकते. या राशींना नेमका काय व कसा लाभ होणार हे जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मकर (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या मंडळींसाठी मंगळाचे गोचर हे लाभदायक सिद्ध होऊ शकते. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत मंगळ हा सहाव्या स्थानी स्थिर होणार आहे, हे स्थान मकर राशीतील सर्वोच्च स्थान असल्याने आपल्याला येत्या काळात सर्वात अधिक प्रभाव व बदल जाणवून येऊ शकतो. आपल्याला नोकरीच्या बाबत यशाचे संकेत आहेत, ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत होतात ती गोष्ट पूर्णत्वाकडे जाण्याचा हा काळ ठरू शकतो. आपल्याला कोर्टाच्या खटल्यांमध्ये सुद्धा शुभ वार्ता मिळू शकते. वडिलांशी नाते संबंध सुधारण्यावर लक्ष द्यावे लागेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. तुम्हाला नोकरीत नवीन संधी आल्याने धनलाभाचे सुद्धा योग आहेत.

मेष (Aries Zodiac)

मेष राशीसाठी मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन हे आर्थिक वृद्धीचा संकेत ठरू शकते. मंगळ ग्रह आपल्या राशीचे स्वामी आहेत व आपल्या गोचर कुंडलीत येत्या काळात तिसऱ्या स्थानी स्थिर होणार आहेत. येत्या काळात तुम्हाला साहस व पराक्रम दाखवण्याची संधी लाभेल. तुमची अडकून पडलेली कामे सुद्धा पूर्ण होऊ शकतात. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांना येत्या काळात यश संपादन करण्याची संधी लाभू शकते. तुम्हाला येत्या काळात तुमच्या भावंडांची साथ लाभू शकते. ज्या मंडळींचे काम परदेशी व्यवसायाशी संबंधित आहे त्यांना मोठा धनलाभ होण्याचे योग आहेत.

हे ही वाचा<< उद्या शनी उदय होताच १२ राशींच्या नशिबाला कशी मिळेल कलाटणी? तुमच्या राशीत धनलाभ की संकट, जाणून घ्या

कन्या (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या मंडळींसाठी मंगळ ग्रहाचे गोचर हे दहाव्या स्थानी अधिक शक्तिशाली असणार आहे. तुम्हाला सुरु केलेल्या प्रत्येक कामाला पूर्ततेपर्यंत न्यावे लागेल पण तिथून तुम्हाला प्रचंड धनलाभ व फायदे होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात अधिक सकारातमक बदल घडून येऊ शकतात. तुमच्या वरिष्ठांसह नाते संबंध दृढ होऊ शकते. तुम्हाला व्यवसायातून अधिक यश लाभू शकते. कामाचा दबाव वाढेल पण मानसिक ताण जाणवणार नाही.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व गृहीतके यांच्यावर आधारित आहे)