Mangal-Budh Gochar 2023: ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारी महिन्यामध्ये ३० वर्षांमधील सर्वात मोठे शनि गोचर होणार आहे. तत्पूर्वी १३ जानेवारीला तीन महत्त्वाचे ग्रह गोचर करणार आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्र अभ्यासकांनुसार, बुध व मंगळ ग्रह हे १३ जानेवारीला मार्गी होणार आहेत. मंगळ ग्रह यादिवशी वृषभ राशीत मार्गी होणार आहे तर बुद्धी व वैभवदाता बुध ग्रह हा धनु राशीत उदय होणार आहे. द्रिक पंचांगाच्या माहितीनुसार १२ जानेवारीच्या रात्रीपासून चंद्र सुद्धा कन्या राशीत गोचर करणार आहे. या तीन ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींच्या भाग्यात हालचाल सुरु होऊ शकते. ज्योतिष तज्ज्ञांच्या माहितीनुसार, १२ राशींपैकी ३ राशींवर सर्वात शुभ प्रभाव दिसून येऊ शकते. या राशींच्या भाग्य मोठा धनलाभ व प्रगतीचे योग आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कधी होणार चंद्र बुध व मंगळाचे गोचर?

ज्योतिष गणनेच्यानुसार १३ जानेवारी २०२३ ला मंगळ ग्रह रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी मंगळ वृषभ राशीत मार्गी होणार आहेत. तर बुध ग्रहाचा सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी धनु राशीत उदय होणार आहेत. चंद्र १२ जानेवारीला रात्री ८ वाजून ५९ मिनिटांनी कन्या राशीत मार्गी होणार आहे. या ग्रहांच्या संक्रमणाच्या तुम्हाला धनलाभ होऊ शकतो का हे जाणून घेऊयात..

मेष राशि (Aries Zodiac)

मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने मंगळ मार्गी व बुध उदयाचा फायदा मेष राशीला होऊ शकतो. या काळात अडकलेले पैसे परत मिळून तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. तुमच्या आरोग्यात सुद्धा या काळात सुद्धार होऊ शकतो. आपल्या राशीला शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा योग आहे पण यासाठी अत्यंत काळजीपूर्वक व स्मार्ट गुंतवणूक करावी. तज्ज्ञांचा सल्ला घेणे विसरू नका. जमिनीच्या व्यवहारात प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

हे ही वाचा<< Aries Yearly Horoscope 2023: मेष राशीला धनलाभ कधी होणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

कर्क (Cancer Zodiac)

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार त्रिगही हालचालींमुळे कर्क राशीला आर्थिक लाभाचे प्रबळ योग आहेत. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना नवीन संधी समोरून चालून येऊ शकतात. तुम्हाला परदेश वारीचे सुद्धा योग आहेत. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीत आहेत त्यांना लवकरच प्रगती व यशाची कवाडे उघडी होऊ शकतात. तुम्हाला नव्या संधींमुळे धनलाभ होऊ शकतो.

हे ही वाचा<< २०२३ च्या पहिल्या अंगारकी चतुर्थीला ‘या’ राशींना अपार धनलाभ होणार? चंद्रोदयाची वेळ व मुहूर्त पाहा

सिंह (Leo Zodiac)

मंगळ, बुध व चंद्राच्या गोचरासह सिंह राशीच्या मंडळींना सुद्धा धनलाभासह श्रीमंतीचे योग आहेत. या काळात मानसिक शांतीचा अनुभव घेता येऊ शकतो. आपल्याला शेअर बाजारातून व्यापार वृद्धीची संधी लाभू शकते. नवीन व्यवसायाचे विचार प्रत्यक्ष उतरवण्यात फायदा होऊ शकतो. आपल्याला सहकर्मचारी, उच्च अधिकारी व ऑफिसमधील मंडळींची साथ लाभू शकते. येत्या काळात तुमच्या आईसह नाती सुधारण्यास सुद्धा शुभ योग आहेत.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)