Mars Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी उदय होतात आणि मावळतात आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. भूमीपुत्र मंगळ १२ तासानंतर उदयास येणार आहे. यामुळे मंगळाचा पूर्ण प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी, ज्यांना मिळू शकतो मंगळाचा खास आशीर्वाद…

धनु
मंगळ ग्रहाचा उदय तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या लग्न घरात मंगळाचा उदय होईल. त्यामुळे यावेळी तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. त्याच वेळी, कुटुंबातील सर्वांशी संबंध सुधारतील आणि आनंद आणि शांती राहील. तसेच, यावेळी तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. मंगळ तुमच्या राशीच्या १२व्या आणि पाचव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तसेच, या काळात तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल.

Conjunction Of Shani And Budh
फेब्रुवारीपासून शनी-बुध देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Shani-Mercury Yuti 2025
शनी-बुध ‘या’ ३ भाग्यशाली राशींना करणार मालामाल; ११ फेब्रुवारीपासून होणार नुसती चांदी
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Mars Transit 2025 In Gemini
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात निर्माण होणार अडचणी; मंगळाच्या वक्री चालीने उद्भवणार आर्थिक समस्या
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख

हेही वाचा – ग्रहांचा अधिपती मंगळ ५ फेब्रुवारीपर्यंत धनु राशीत राहणार, ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल अपार धन, अविवाहितांना येईल लग्नासाठी स्थळ

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचा उदय लाभदायक ठरू शकतो. कारण मंगळ तुमच्या राशीतून नवव्या घरात येईल. म्हणून, यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी प्रवास करू शकता, जे शुभ राहील. या काळात तुमच्या धनप्राप्तीच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या व्यवसायात नफा वाढेल. तुम्ही कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. मंगळ तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे मंगळाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

हेही वाचा – बुधादित्य, नवपंचमसह घडणार ‘हे’ महायोग! ‘या’ ४ राशींच्या व्यक्तींचे भाग्य बदलणार, नोकरी-व्यवसायात मिळेल नशीबाची साथ!

मीन
मंगळाचे उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीतील कर्म घरात मंगळाचा उदय होईल. त्यामुळे जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यवसायात नफा वाढेल आणि यावेळी पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. त्याचबरोबर बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसेच, यावेळी तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. यावेळी वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. परंतु शनीची साडेसाती तुमच्यावर चालू आहे, त्यामुळे यावेळी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader