Mangal Vakri 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह ७ डिसेंबर रोजी कर्क राशीत वक्री होणार आहे. अशा स्थितीत वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मंगळाची वक्री चाल काही राशींच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पाडणारी असेल असे मानले जाते. मंगळ ग्रहाच्या उलट्या चालीमुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक तोट्यासह अनेक कामांत अडचणी येण्याची शक्यता आहे. मंगळाच्या उलट्या चालीमुळे नेमका कोणत्या राशींना फटका सहन करावा लागेल जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ जेव्हा उलट चाल करतो तेव्हा हा काळ अनेक समस्या घेऊन येतो. नैसर्गिक आपत्ती, रोग आणि आर्थिक नुकसान यांसारख्या समस्या वाढू शकतात. विशेषत: मेष, वृषभ, मिथुन, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांनी यावेळी काळजी घेणे आवश्यक आहे. याचा या राशींवर काय परिणाम होईल पाहू.

मंगळाच्या उलट्या चालीमुळे ‘या’ राशींना करावा लागू शकतो अडचणीचा सामना

मेष

मंगळाची उलटी चाल मेष राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम करू शकते. या काळात घरामध्ये तणाव वाढू शकतो आणि तुम्हाला सुख-सुविधांचा अभाव जाणवेल. करिअरमध्ये अडचणी आणि सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता असून खर्च वाढू शकतो. कुटुंबाशी मतभेद होऊ शकतात आणि आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल, विशेषतः पाठदुखी आणि फुफ्फुसाच्या समस्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

वृषभ

मंगळाची उलटी चाल वृषभ राशीच्या लोकांसाठीही नुकसानदायक ठरू शकते. या काळात प्रवासात अडचणी येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि नात्यात गैरसमज वाढू शकतात. नोकरीत बदलीचे संकेत आहेत. व्यवसायात तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही.आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन

मंगळाची उलटी चाल मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी घेऊन येऊ शकते. या काळात आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते आणि कर्ज वाढू शकते. कुटुंबात भांडणे होऊ शकतात आणि करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. व्यवसायात नवीन योजना बनवाव्या लागतील. खर्च वाढू शकतो आणि जोडीदाराबरोबरच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, विशेषत: डोळे आणि दातांच्या समस्या असू शकतात.

सिंह

मंगळाच्या वक्री चालीने सिंह राशीच्या लोकांनाही काळजी घेण्याची गरज आहे. या काळात नोकरीत बदलाचे संकेत आहेत. नशीब तुमच्या बाजूने कमी असल्याने व्यवसायातही नुकसान होऊ शकते. मानसिक तणाव वाढू शकतो आणि प्रवासात काळजी घ्या. पाय आणि सांधे दुखीची समस्या वाढू शकते.

Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीदेव ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव! मीन राशीत परिवर्तन करताच मिळणार नवी नोकरी, पैसा अन् प्रसिद्धी

कुंभ

मंगळाच्या वक्री हालचालीचा कुंभ राशीच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कष्टांना यश मिळेल, पण मन समाधानी राहणार नाही. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायातील भागीदारी तुटू शकते आणि खर्च वाढू शकतो. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याबाबत काळजी घ्या, ॲलर्जी किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे,)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangal vakri 2024 mars retrograde in kark rashi aries gemini cancer and these zodiac sign should be alert mangal gochar sjr