Mangal Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ग्रहांचा सेनपती मंगळ ग्रहाला साहस, ऊर्जा, शक्ती, पराक्रमाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मंगळ राशीचे राशीपरिवर्तन होते, त्यावेळी त्याचा प्रभाव इतर राशींवरही होतो. लवकरच २०२५ या नव्या वर्षाची सुरूवात होणार असून नव्या वर्षाच्या सुरूवातीला काही ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. मंगळ ग्रहाचादेखील जानेवारीमध्ये मिथुन राशीत प्रवेश होईल, याच काळात मंगळ वक्री अवस्थेत प्रवेश करेल. मंगळाच्या या राशी परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील.
मंगळ करणार मालामाल
मेष
मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाची वक्री अवस्था प्रत्येक कामात यश देईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवन सुखाचे क्षण येतील.
तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींनाही मंगळाची वक्री अवस्था खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात प्रमोशन होईल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींनाही मंगळाच्या वक्री अवस्थेचे सकारात्मक फळ मिळेल. या काळात या राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात समाजात मानसन्मान मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. धार्मिक यात्रा घडतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. स्पर्धा परिक्षेत हवे तसे यश मिळवता येईल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)