Mangal Vakri 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा धैर्य, शौर्य, पराक्रम, वीरता, भूमी आणि क्रोध यांचा कारक मानला जातो, त्यामुळे मंगळाच्या हालचालीतील बदलाचा परिणाम हा सर्वच क्षेत्रांवर होत असतो. यात ज्योतिषशास्त्रात मंगळाची उलटी चाल खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. ग्रहांचा सेनापती मंगळ जानेवारीत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ वक्री अवस्थेत प्रवेश करणार असल्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते, तसेच या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. याशिवाय सुख, समाधान लाभू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळ ग्रहाची वक्री चाल, ‘या’ राशींना होणार जबरदस्त लाभ (Mangal Vakri 2025 In Mithun)

मेष

मंगळाची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात मेष राशीच्या लोकांचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. शत्रूंवर विजय मिळवण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकते. तसेच या काळात तुम्हाला भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळू शकते. तसेच ज्यांचे काम किंवा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, अशा लोकांना चांगले लाभ मिळू शकतात.

तुळ

मंगळाची वक्री चाल तुळ राशीसाठी फलदायी ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ लाभेल. काम किंवा व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवासाच्या अनेक संधी मिळतील. नोकरी, व्यवसाय आणि नोकरीत उत्तम आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढेल. नेतृत्व क्षमता विकसित होईल. तुम्ही तुमचे काम वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकाल. आयुष्यात काही अडचणी येतील, पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.

हेही वाचा –

u

सिंह

मंगळाची वक्री चाल सिंह राशीसाठी शुभ ठरू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्न वाढीच्या नवीन संधी तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्ही नवीन संधींचा फायदा घेऊन भरपूर नफा कमवू शकाल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मान आणि प्रतिष्ठा मिळेल. सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होईल.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangal vakri 2025 mars transit in mithun these 3 zodiac sign will be lucky earn more money sjr