Mangala Gauri Vrat 2024: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र आणि आध्यात्मिक मानला जातो. या महिन्यात भगवान महादेवांची पूजा, आराधना करण्याचे महत्त्व सांगितले जाते. येत्या ५ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्याची सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी श्रावणी सोमवारदेखील आहे. तसेच यंदा पाच श्रावणी सोमवार साजरे केले जातील. श्रावणात श्रावणी सोमवार व्यतीरिक्त नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी हे सणदेखील साजरे केले जातात, तसेच श्रावणी मंगळवारी अनेक ठिकाणी मंगळागौरीचे पूजन केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळागौर महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्येदेखील बऱ्याच ठिकाणी साजरी करण्याची प्रथा आहे. नवविवाहित स्त्रियांसाठी हा सण प्रामुख्याने साजरा करतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते. यंदा पहिली मंगळागौर ६ ऑगस्ट २०२४ या दिवशी साजरी केली जाईल, तसेच यावर्षी पाच श्रावणी सोमवारबरोबर पाच श्रावणी मंगळवारदेखील असणार आहेत.

मंगळागौर साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व (Mangala Gauri Importance)

मंगळागौरीच्या व्रतामध्ये देवी पार्वतीच्या पूजेबरोबर महादेवांची पूजादेखील केली जाते. अनेक ठिकाणी हे व्रत अविवाहित मुली सौभाग्य प्राप्तीसाठी आणि विवाहित महिला अखंड सौभाग्यासाठी करतात. पण, महाराष्ट्रात हे व्रत केवळ विवाहित स्त्रियाच करतात. हे व्रत केल्याने वैवाहिक आयुष्य सुखमय होते व कुटुंबात सुख-समृद्धी नांदते असे म्हटले जाते. तसेच या व्रतामुळे देवी पार्वतीसह महादेवांचा आशीर्वाददेखील प्राप्त होतो. मंगळगौर नवविवाहितेचं गोडकौतुक करण्यासाठी साजरी केली जाते. लग्नानंतर सलग ५ वर्ष मंगळागौर साजरी करण्याची प्रथा आहे.तसेच या दिवशी सर्व महिला एकत्र येऊन विविध खेळ खेळतात, झिम्मा, फुगडी खेळतात. गाणी गातात. यामुळे महिलांनी रोजच्या कामातून विरंगुळा मिळतो.

पहिल्या मंगळागौरीची तिथी (Mangala Gauri Tithi)

हिंदू पंचांगानुसार ५ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार असून याच दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला पहिली मंगळागौर साजरी केली जाईल.

हेही वाचा: १५ नोव्हेंबरपर्यंत पैसाच पैसा! शनि निर्माण करणार ‘शश राजयोग’, ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार भरपूर पैसा

मंगळागौरीची तारीख (Mangala Gauri Date)

६ ऑगस्ट २०२४ पहिली मंगळागौर
१३ ऑगस्ट २०२४ दुसरी मंगळागौर
२० ऑगस्ट २०२४ तिसरी मंगळागौर
२७ ऑगस्ट २०२४ चौथी मंगळागौर
३ सप्टेंबर २०२४ पाचवी मंगळागौर

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)