Margashirsha Purnima 2024 Horoscope : आज १५ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी आणि रविवार आहे. पौर्णिमा तिथी रविवारी दुपारी २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत राहील.या दिवशी दुपारी २ वाजून ०४ मिनिटांपर्यंत शुभ योग राहील. तसेच रात्री 2 वाजून २० मिनिटांपर्यंत मृगाशिरा नक्षत्र जागृत राहील. अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांपासून दुपारी १३ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असेल. तर राहुकाल दुपारी ४ वाजून ५ मिनिटांपासून ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत राहील. यादिवशी चंद्र वृषभ राशीत असेल.

दरम्यान आजच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असते. या दिवशी पूजा आणि पवित्र स्नान (गंगास्नान) याचबरोबर व्रत ठेवण्याची परंपरा आहे.धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी योग्य पूजा (मार्गशीर्ष पूजा) केल्याने जीवनात धन-संपत्तीची वृद्धी होते आणि आनंदाची भरभराट होते असे मानले जाते. या मार्गशीर्ष पौर्णिमेला माता लक्ष्मी कोणत्या राशींचे भाग्य उजळवणार हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊ..

Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Mata Lakshmi's Blessings
२०२५ मध्ये या तीन राशींना मिळणार पैसाच पैसा! माता लक्ष्मीच्या कृपेमुळे सुटतील आर्थिक समस्या
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १० दिवसानंतर पालटणार तीन राशींचे नशीब, सूर्य देवाच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख
Shukra Gochar 2024 Venus Transit 2024 in Capricorn astrology
Shukra Gochar 2024 : पुढील २६ दिवस या तीन राशींवर पडणार पैशांचा पाऊस! शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशाने करिअर, व्यवसायात भरघोस नफा
Margashirsha Guruvar 2024 vrat First And Last date in marathi
Margashirsha Guruvar 2024: मार्गशीर्ष महिन्यात यंदा किती गुरुवार? जाणून घ्या तारखा, पूजा विधी अन् मुहूर्त
Horoscope 2025 Malavya rajyog in meen shukra gochar
Malavya Rajyog 2025 : नवीन वर्षात ‘या’ राशींची होणार आर्थिक भरभराट! मालव्य राजयोगामुळे बनाल अमाप संपत्तीचे मालक अन् घराचे स्वप्न होईल पूर्ण

१५ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य ( 15 December 2024 Horoscope Panchang & Rashi Bhavishya)

मेष:-घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. काही धार्मिक विधींनी मनाला शांति मिळेल. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मनातील इच्छा बोलून दाखवाल.

वृषभ:-आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील. नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल. मानसिक शांतता लाभेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

मिथुन:-जुनी उधारी वसूल होईल. घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.

कर्क:-मानसिक चंचलता जाणवेल. नवीन कामासाठी चांगला वेळ. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.

सिंह:-व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल.

कन्या:-मित्रांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा.

तूळ:-आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.

वृश्चिक:-अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. कामातील समस्या दूर होतील. नवीन ओळख होईल.

धनू:-नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका. स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. राजकारणापासून दूर राहावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल.

मकर:-काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा. अति विचार करत बसू नका. भावंडांची बाजू समजून घ्यावी.

कुंभ:-कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

मीन:-अंग मेहनतीला मागे हटु नका. मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. संयमाने कामे करावीत.

Story img Loader