Marriage Line in Female Hand in Marathi: हस्तरेखाशास्त्रात व्यक्तीच्या हातावरील विवाह रेखांना विशेष महत्त्व आहे. जर या रेखांवरून तुमचे योग शुभ असतील तर तुम्हाला वैवाहिक आयुष्यात प्रचंडच सुख व अपार समृद्धी लाभू शकते असं मानलं जातं. असं म्हणतात की जर एखाद्याचा पार्टनर योग्य असेल तर त्याचे आयुष्य सहज सोपे होण्यास हातभार लागू शकतो. याशिवाय तुम्हाला मानसिक शांती अनुभवता येऊ शकते. अनेकदा जोडीदार हा लक्ष्मीच्या रूपात आयुष्यात येत असतो ज्यामुळे धनसंपत्तीची कमतरता दूर होऊन आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता असते. हातावर विवाह रेखा नेमकी कुठे असते व त्याच्या विविध स्वरूपांमधून नेमके काय अर्थ समोर येतात हे आपण जाणून घेऊया …

विवाह रेखा हाताच्या करंगळीच्या खालील बाजूला असते. तुम्ही नीट पाहिल्यास करंगळीच्या खाली लहान आडव्या रेषा असतात, ज्या हाताच्या तळव्याच्या बाहेरून आतील बाजूस येतात. या रेषा हृदय रेखेच्या वर असतात. विवाह रेखांच्या आकार व स्पष्टतेवरून त्याचे अर्थ जाणून घेऊया…

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
supreme court marital dispute case
Factors to decide Alimony Amount: घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम किती असावी? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले ८ महत्त्वाचे घटक
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती

१) जर हातावरील विवाह रेखा अस्पष्ट असेल आणि चंद्र पर्वतावरील एखादी रेष विवाह रेखेला छेदून पुढे जात असेल तर असे लोक लग्नाच्या बाबत खूपच नशीबवान मानले जातात. या लोकांना आयुष्यात श्रीमंत जोडीदार मिळण्याची शक्यता असते. तसेच यांचे सासर सुद्धा अत्यंत आर्थिक सबळ असल्याचे मानले जाते.

२) विवाह रेखा व चंद्र पर्वतातून निघणारी रेषा एकत्र पुढे जात असल्यास या व्यक्तीस अत्यंत प्रेमळ जोडीदार लाभू शकतो. आर्थिक सबळतेसह त्यांना भावनिक समृद्ध वातावरण अनुभवता येऊ शकते. यामुळे पूर्णत्वाने समृद्ध आयुष्य जगणे यांना शक्य असते.

३) ज्यांची विवाह रेखा थोडी धूसर व बारीक असते त्यांना नाते हे नावापुरते जपण्याची सवय असते. त्यांची नात्यातील गुंतवणूक कमी असू शकते त्यामुळे यांचे वारंवार ब्रेकअप व पॅच अप होत असतात. विवाहबाह्य संबंध सुद्धा असण्याची शक्यता असते.

४) रंगांचा सुद्धा विवाह रेषेशी संबंध असतो म्हणजे लालसर विवाह रेखा ही उर्जावान व उत्साही प्रेमाचे व विवाह जीवनाचे प्रतीक मानले जाते तर पिवळसर विवाह रेखा ही निरुत्साही जीवनाचे प्रतीक मानले जाते.

५) दोन विवाह रेखा असल्यास अशा मंडळींची २ लग्न होण्याची शक्यता असते.

हे ही वाचा<< ५ दिवसांनी गजकेसरी राजयोग बनल्याने ‘या’ राशींची स्वप्न होणार पूर्ण? पैसाच पैसा मिळवायची हीच वेळ

६) विवाह रेखा तुटक असणे हे जोडीदाराच्या खराब आरोग्याची निशाण मानले जाते.

(टीप:वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू समजू नये)

Story img Loader